FIH Nations Cup 2026 : दीपिकाची कमाल! अंतिम क्षणी थरारक गोल करत उरुग्वेचा धुव्वा; भारतीय संघाची दिमाखात उपांत्य फेरीत धडक!

FIH Nations Cup 2026 : भारतीय हॉकी संघ ग्रुपमध्‍ये अव्‍वल स्‍थानी
FIH Nations Cup 2026
FIH Nations Cup 2026 : उरुग्वेने बरोबरी साधल्यानंतर अवघ्या एका मिनिटात दीपिकाने आणखी एक शानदार गोल करत भारताला ३-२ अशी विजयी आघाडी मिळवून दिली.Pudhari
Published on
Updated on
Summary

या विजयासह भारतीय संघाने आपल्या ग्रुपमध्ये अव्वल स्थान पटकावले असून जेतेपदाच्या दिशेने मजबूत पाऊल टाकले आहे.

FIH Nations Cup 2026 : ‘महिला एफआयएच नेशन्स कप २०२६’ मध्ये भारतीय संघाने आपली दमदार कामगिरी कायम ठेवली आहे. भारताने उरुग्वेचा ३-२ असा पराभव करत दिमाखात उपांत्य फेरीत (सेमीफायनल) प्रवेश केला आहे. टीम इंडियाची स्‍टार खेळाडू दीपिका या विजयाची शिल्‍पकार ठरली.

पहिल्या सत्रात उरुग्वेची आघाडी

सामन्याच्या पहिल्या सत्रात (क्वार्टर) टीम इंडियाला काही अडचणींचा सामना करावा लागला. उरुग्वोने आक्रमक खेळ करत १३ व्या मिनिटाला गोल डागला आणि १-० अशी आघाडी घेतली. या सुरुवातीच्या गोलमुळे भारतीय संघावर दडपण वाढले होते. मात्र, भारतीय खेळाडूंनी संयम राखत आपले आक्रमण सुरूच ठेवले.

FIH Nations Cup 2026
IND vs PAK T20 WC LIVE : भारताचा 64 धावांनी धमाकेदार विजय, पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; दिप्ती शर्माने घेतल्या 5 विकेट

दुसर्‍या सत्रात भारताने साधली बरोबरी

दुसऱ्या सत्रात भारताला बरोबरी साधण्याची संधी मिळाली. टीम इंडियाची आघाडीच्‍या (फॉरवर्ड) फळीतील दीपिकाने २४ व्या मिनिटाला गोल करत स्कोअर १-१ असा बरोबरीत आणला. या गोलमुळे भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आणि संघाने सामन्यावर आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली.

FIH Nations Cup 2026
India Archery World Cup Gold Medal : भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! थरारक शूट-ऑफमध्ये चीनचा पराभव

तिसर्‍या सत्रात भारताचा दबदबा

तिसऱ्या सत्रात भारताने सामन्यात आघाडी घेतली. दीपिका सोरेंगने ४३ व्या मिनिटाला एका उत्तम चालीचे गोलमध्ये रूपांतर करत संघाला २-१ ने पुढे नेले. यानंतर भारतीय संघाने उरुग्वेवर सतत दबाव वाढवला आणि त्यांना पुनरागमन करण्याची फारशी संधी दिली नाही.

१ मिनिटात दीपिकाने फिरवला सामना!

चौथ्या आणि अंतिम सत्रामध्ये हा सामना कमालीचा रोमांचक झाला. उरुग्वेच्या विल्लार मॅन्युएलाने ५५ व्या मिनिटाला गोल करून स्कोअर २-२ असा बरोबरीत आणला. हा सामना आता ड्रॉ (बराबरी) होणार असे वाटत असतानाच भारताची स्टार खेळाडू दीपिकाने पुन्हा एकदा आपली जादू दाखवली. उरुग्वेने बरोबरी साधल्यानंतर अवघ्या एका मिनिटात दीपिकाने आणखी एक शानदार गोल करत भारताला ३-२ अशी विजयी आघाडी मिळवून दिली. अंतिम मिनिटांत भारतीय संघाने भक्कम बचाव करत उरुग्वेला पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही. सामना संपेपर्यंत भारताने आपली आघाडी कायम ठेवत महत्त्वपूर्ण विजय नोंदवला.

FIH Nations Cup 2026
IND vs ENG: शेवटच्या २ ओव्हर्स अन् अक्षरचा तो 'फ्लाईंग कॅच'; वानखेडेवर भारताने इंग्लंडला कसं लोळवलं?

आता लक्ष्‍य फायनलचे

या विजयासह भारतीय महिला हॉकी संघाने ग्रुप स्टेजचा शेवट अव्वल स्थानावर केला आहे. सध्या संघाचा आत्मविश्वास उंचावला असून आता सेमीफायनल जिंकून फायनलमध्ये धडक मारण्‍याचे संघाचे लक्ष असेल भारतीय रणरागिणींचे लक्ष असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news