IND vs ENG: शेवटच्या २ ओव्हर्स अन् अक्षरचा तो 'फ्लाईंग कॅच'; वानखेडेवर भारताने इंग्लंडला कसं लोळवलं?

India vs England highlights, T20 World Cup Semi-Final 2026: आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या थरारक उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडचा ७ धावांनी पराभव करत फायनलमध्ये जोरदार धडक मारली.
India vs England highlights, T20 World Cup Semi-Final 2026
India vs England highlights, T20 World Cup Semi-Final 2026file photo
Published on
Updated on

India vs England highlights, T20 World Cup Semi-Final 2026

मुंबई: आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या थरारक उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडचा ७ धावांनी पराभव करत फायनलमध्ये जोरदार धडक मारली. गुरुवारी मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने विजयासाठी दिलेल्या २५४ धावांच्या डोंगराचा पाठलाग करताना इंग्लंडला ७ गड्यांच्या मोबदल्यात २४६ धावांपर्यंतच मजल मारता आली. आता ८ मार्च रोजी होणाऱ्या महाअंतिम सामन्यात भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणार आहे.

India vs England highlights, T20 World Cup Semi-Final 2026
Arjun Tendulkar Saaniya Chandhok Wedding : अर्जुन-सानिया विवाहबंधनात; महालक्ष्मी रेसकोर्सवर रंगला शाही विवाहसोहळा (PHOTO)

संजू सॅमसनचे 'विराट' वादळ

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनने इंग्लिश गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. सॅमसनने अवघ्या ४२ चेंडूंमध्ये ८९ धावांची तुफानी खेळी साकारली, ज्यामध्ये ७ षटकार आणि ८ चौकारांचा समावेश होता. १५ धावांवर असताना हॅरी ब्रूकने त्याचा झेल सोडला, जो इंग्लंडला चांगलाच महागात पडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय फलंदाजीने ५०० धावांच्या या 'हाय-स्कोरिंग' खेळपट्टीवर वर्चस्व गाजवले.

अक्षर पटेल: फिल्डिंगचा 'गेमचेंजर'

धावांचा पाऊस पडत असताना अक्षर पटेलने आपल्या अफलातून क्षेत्ररक्षणाने सामन्याचे पारडे फिरवले. त्याने हवेत झेपावत इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकचा घेतलेला झेल हा सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. त्याशिवाय विल जॅक्स आणि फिल साल्टचे महत्त्वाचे झेल टिपून त्याने इंग्लंडच्या धावगतीला लगाम घातला.

बुमराह-हार्दिकचे ते 'मॅजिकल' ओव्हर्स

सामना शेवटच्या टप्प्यात असताना १८ व्या आणि १९ व्या षटकाने विजय भारताच्या झोळीत टाकला. १८ वे षटक बुमराहने अत्यंत अचूक मारा करत केवळ ६ धावा दिल्या. १९ वे षटक हार्दिकने केवळ ९ धावा देत सॅम करनचा महत्त्वपूर्ण बळी घेतला. या दोन षटकांमुळे इंग्लंडला शेवटच्या ओव्हरमध्ये ३० धावांचे कठीण आव्हान मिळाले, जे त्यांना पेलता आले नाही.

भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवून भारताने विजेतेपद पटकावले होते. आता न्यूझीलंडला पराभूत करून भारत दोन सलग विश्वचषक जिंकणारा पहिला संघ आणि यजमान म्हणून विश्वचषक जिंकणारा पहिला देश ठरून नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे.

India vs England highlights, T20 World Cup Semi-Final 2026
IND vs ENG : ३९ चौकार.. ३४ षटकार.. ४९९ धावा! वानखेडेवर धावांचा 'महापूर', भारताची विक्रमी चौथ्यांदा वर्ल्डकप फायनलमध्ये धडक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news