‘Women's ODI World Cup’साठी इंग्लंडचा संघ जाहीर! नॅट सायव्हर-ब्रंटकडे नेतृत्व

संघात हेदर नाइट, डॅनी व्याट-हॉज आणि सारा ग्लेन यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंचा समावेश
‘Women's ODI World Cup’साठी इंग्लंडचा संघ जाहीर! नॅट सायव्हर-ब्रंटकडे नेतृत्व
Published on
Updated on

भारताच्या यजमानपदाखाली 30 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) आपल्या संघाची घोषणा केली आहे. या संघात आशियातील परिस्थिती लक्षात घेता, चार विशेषज्ञ फिरकी गोलंदाजांना स्थान देण्यात आले आहे.

इंग्लंड संघाचे नेतृत्व नॅट सायव्हर-ब्रंटकडे सोपवण्यात आले आहे. संघात हेदर नाइट, डॅनी व्याट-हॉज आणि सारा ग्लेन यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. हेदर नाइट हिला याच वर्षी मे महिन्यात हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे संघाबाहेर राहावे लागले होते. पण, तिने वेळेत तंदुरुस्त होऊन विश्वचषक संघात पुनरागमन केले आहे.

‘Women's ODI World Cup’साठी इंग्लंडचा संघ जाहीर! नॅट सायव्हर-ब्रंटकडे नेतृत्व
Ajit Agarkar's Contract Revises : अजित आगरकरांना BCCI कडून बक्षीस! 2026 पर्यंत निवड समिती अध्यक्षपदी मुदतवाढ

फिरकी गोलंदाजांना प्राधान्य

कर्णधार म्हणून नॅट सायव्हर-ब्रंट आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून शार्लट एडवर्ड्स यांच्यासाठी ही पहिलीच आयसीसी स्पर्धा असेल. केट क्रॉस, माइया बाउचर आणि एलिस-डेव्हिडसन रिचर्ड्स यांना मात्र संघात स्थान मिळवता आलेले नाही. दुसरीकडे, डॅनी व्याट-हॉज हिला या वर्षी भारताविरुद्धच्या मालिकेला मुकावे लागले होते, परंतु आता तिने विश्वचषक संघात यशस्वी पुनरागमन केले आहे.

‘Women's ODI World Cup’साठी इंग्लंडचा संघ जाहीर! नॅट सायव्हर-ब्रंटकडे नेतृत्व
Shardul Thakur Captain : ‘लॉर्ड’ शार्दुल ठाकूर मुंबई रणजी संघाचा नवा कर्णधार, रहाणे पायउतार होताच एमसीएचा मोठा निर्णय

विश्वचषक स्पर्धा भारत आणि श्रीलंकेच्या मैदानांवर होणार असल्याने, तेथील खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजांना पोषक ठरण्याची दाट शक्यता आहे. हेच लक्षात घेऊन इंग्लंडने आपल्या संघात सारा ग्लेन आणि सोफी एक्लेस्टोन यांच्यासह एकूण चार फिरकी गोलंदाजांना स्थान दिले आहे. चार्ली डीन आणि लिंडसे स्मिथ या अन्य दोन फिरकी गोलंदाज आहेत.

‘Women's ODI World Cup’साठी इंग्लंडचा संघ जाहीर! नॅट सायव्हर-ब्रंटकडे नेतृत्व
Ajinkya Rahane : मुंबई संघाच्या भविष्यासाठी रहाणेचा मोठा निर्णय! अचानक कर्णधार पदाचा केला त्याग, क्रिकेट वर्तुळात खळबळ

वेळापत्रकात बदलाची शक्यता

विश्वचषकाचे वेळापत्रक यापूर्वीच जाहीर झाले आहे. मात्र, तरीही बेंगळूरु येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणारे सामने अन्य ठिकाणी स्थलांतरित केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इंग्लंडचा पहिला सामना ३ ऑक्टोबर रोजी बेंगळूरु येथे द. आफ्रिकेविरुद्ध नियोजित आहे. तथापि, एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाबत अंतिम निर्णय झाल्यानंतरच इंग्लंडच्या सामन्यासह संपूर्ण वेळापत्रकावर शिक्कामोर्तब होईल.

‘Women's ODI World Cup’साठी इंग्लंडचा संघ जाहीर! नॅट सायव्हर-ब्रंटकडे नेतृत्व
ICCकडून चूक मान्य, ODI क्रमवारी पुन्हा जाहीर! रोहित-विराटच्या स्थानावर शिक्कामोर्तब

एकदिवसीय विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ :

नॅट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), सोफी एक्लेस्टोन, एमी जोन्स, टॅमी ब्यूमोंट, हेदर नाइट, डॅनी व्याट-हॉज, चार्ली डीन, लॉरेन बेल, सोफिया डंकले, एम अर्लट, लिंडसे स्मिथ, सारा ग्लेन, एम्मा लॅम्ब, एलिस कॅप्सी, लॉरेन फाइलर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news