3-Over Century: 14 षटकार 29 चौकार! फक्त 3 ओव्हर्समध्ये शतक; क्रिकेट इतिहासातील सर्वात अविश्वसनीय रेकॉर्ड

Don Bradman’s 3-Over Century: डॉन ब्रॅडमन यांनी 1931 मध्ये अवघ्या 22 चेंडूंमध्ये शतक झळकावत क्रिकेट इतिहासात अविश्वसनीय विक्रम केला होता. ब्लॅकहीथ संघाकडून खेळताना त्यांनी 256 धावांची तुफानी खेळी केली.
3-Over Century
3-Over CenturyPudhari
Published on
Updated on

Don Bradman’s 3-Over Century: क्रिकेटच्या इतिहासात अनेक विक्रम झाले आहेत. काही विक्रम इतके भव्य असतात की त्यावर विश्वास ठेवणंही कठीण होतं. पण जगातील महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांनी असा एक विक्रम केला होता, जो आजही जवळपास अशक्य मानला जातो.

फक्त तीन ओव्हर्समध्ये शतक झळकावण्याचा पराक्रम त्यांनी 1931 मध्ये करून दाखवला होता. आजच्या टी-20 क्रिकेटमध्येही अनेक फलंदाजांना शतकासाठी संघर्ष करावा लागतो, तिथे ब्रॅडमन यांनी तब्बल 22 चेंडूंमध्ये शतक ठोकून क्रिकेट विश्व हादरवलं होतं.

1931 मधील ऐतिहासिक विक्रम

2 नोव्हेंबर 1931 रोजी खेळल्या गेलेल्या एका क्लब सामन्यात हा ऐतिहासिक पराक्रम घडला. ब्लॅकहीथ संघाकडून खेळताना ब्रॅडमन यांनी लिथगो संघाविरुद्ध धडाकेबाज फलंदाजी केली.

3-Over Century
Team India Olympic squad : IPL 2026 मधून ऑलिम्पिकसाठी १५ सदस्यीय भारतीय संघ सज्ज; वैभव-प्रियांश-अभिषेक-इशान ‘गोल्ड मेडल’...

त्या काळात एका ओव्हरमध्ये 6 नव्हे तर 8 चेंडू असायचे. या सामन्यात ब्रॅडमन यांनी सुरुवातीच्या तीन ओव्हर्समध्येच शतक पूर्ण केलं.

पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी 33 धावा केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 40 धावा ठोकल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आणखी 29 धावा काढल्या. अशा प्रकारे अवघ्या 22 चेंडूंमध्ये त्यांनी शतक पूर्ण केलं.

गोलंदाजांची अक्षरशः धुलाई

लिथगो संघाचा गोलंदाज विल ब्लॅक पहिला ओव्हर टाकण्यासाठी आला. ब्रॅडमन यांनी त्याच्या गोलंदाजीवर तुफानी हल्ला चढवत 3 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 33 धावा केल्या.

दुसऱ्या ओव्हरमध्ये हौरी बेकर गोलंदाजीसाठी आला. मात्र त्याची अवस्था आणखी बिकट झाली. ब्रॅडमन यांनी या ओव्हरमध्ये 4 षटकार आणि 4 चौकार ठोकत तब्बल 40 धावा चोपल्या.

तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा विल ब्लॅक गोलंदाजीला आला, पण ब्रॅडमन यांनी त्यालाही सोडलं नाही. या ओव्हरमध्ये त्यांनी 29 धावा केल्या.

3-Over Century
Raja Shivaji: ‘राजा शिवाजी’ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज एन्ट्री; काही तासांत विकली 40 हजार तिकिटं, किती कोटी कमावले?

256 धावांची वादळी खेळी

या सामन्यात ब्रॅडमन यांनी केवळ शतकच झळकावलं नाही, तर तब्बल 256 धावांची खेळी केली. त्यांच्या या डावात 29 चौकार आणि 14 षटकारांचा समावेश होता. त्यांचा साथीदार वेन्डेल बिल यांनी 68 धावा केल्या. ब्लॅकहीथ संघाने प्रथम फलंदाजी करत 357 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात लिथगो संघ 228 धावांवर गारद झाला आणि ब्लॅकहीथ संघाने हा सामना 129 धावांनी जिंकला.

आजच्या आक्रमक क्रिकेटच्या युगातही 22 चेंडूंमध्ये शतक झळकावणं जवळपास अशक्य मानलं जातं. त्यामुळे ब्रॅडमन यांचा हा विक्रम आजही क्रिकेट इतिहासात सर्वात अविश्वसनीय विक्रम मानला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news