Raja Shivaji: ‘राजा शिवाजी’ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज एन्ट्री; काही तासांत विकली 40 हजार तिकिटं, किती कोटी कमावले?

Raja Shivaji Advance Booking: ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये काही तासांतच 40 हजारांहून अधिक तिकिटांची विक्री करत दमदार सुरुवात केली आहे. या चित्रपटाने 1 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
Raja Shivaji Advance Booking
Raja Shivaji Advance BookingPudhari
Published on
Updated on

Raja Shivaji Advance Booking: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि तो म्हणजे राजा शिवाजी. रितेश देशमुखचा हा ऐतिहासिक चित्रपट रिलीजपूर्वीच चर्चेत आला असून अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये चित्रपटाने दमदार कमाई करत बॉक्स ऑफिसवर मोठ्या ओपनिंगचे संकेत दिले आहेत.

चित्रपटात रितेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. आता अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू होताच या उत्सुकतेचं रूपांतर तिकीट विक्रीत झालेलं दिसत आहे.

काही तासांत कोट्यवधींची कमाई

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘राजा शिवाजी’ने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून अवघ्या काही तासांत १.१२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंत तब्बल ४३,६९७ तिकिटांची विक्री झाली आहे. चित्रपटासाठी ११८२ शो ठेवण्यात आले असून अनेक ठिकाणी तिकिटांसाठी मोठी मागणी पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे या कमाईत मराठी प्रेक्षकांचा मोठा वाटा आहे. मराठी व्हर्जनमधूनच चित्रपटाने १.०७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर हिंदी व्हर्जनमधून तुलनेने कमी म्हणजे सुमारे ४ लाख रुपयांची कमाई झाली आहे.

मुंबई-पुण्यात प्रचंड क्रेझ

चित्रपटाला सर्वाधिक प्रतिसाद मुंबई आणि पुणे शहरांमधून मिळताना दिसत आहे. मुंबईतून चित्रपटाने जवळपास ५० लाख रुपयांची अ‍ॅडव्हान्स बुकिंग कमाई केली आहे, तर पुण्यातून सुमारे ३२ लाख रुपये जमा झाले आहेत.

याशिवाय कोल्हापूर, नाशिक, नागपूर आणि सांगलीसारख्या शहरांमधूनही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

चित्रपटात स्टारकास्टची दमदार फौज

‘राजा शिवाजी’मध्ये रितेश देशमुखसोबत संजय दत्त महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच अभिषेक बच्चनची देखील चित्रपटात महत्त्वाची भूमिका असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, सलमान खानच्या कॅमिओबाबतही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. निर्मात्यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली नसली तरी सोशल मीडियावर या चर्चेला जोर आला आहे.

Raja Shivaji Advance Booking
3 Idiots 2 : आमिर खानने दिलं सरप्राइज; पुन्हा परतणार रॅंचो, राजू आणि फरहानची जादू

‘छावा’ला टक्कर देणार?

आता सर्वात मोठा प्रश्न असा विचारला जात आहे की, ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर किती मोठा विक्रम करू शकतो? विशेषतः छावा या ऐतिहासिक चित्रपटाशी त्याची तुलना सुरू झाली आहे.

Raja Shivaji Advance Booking
Shah Rukh Khan’s King: बॉक्स ऑफिसवर ‘किंग’ची एन्ट्री कधी होणार? SRKच्या नव्या टीझरमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ

अ‍ॅडव्हान्स बुकिंगला मिळालेला प्रतिसाद पाहता ‘राजा शिवाजी’ला दमदार ओपनिंग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऐतिहासिक विषय, मोठी स्टारकास्ट आणि महाराष्ट्रात असलेला भावनिक संबंध यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करू शकतो, अशी चर्चा सध्या चित्रपटसृष्टीत सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news