Lungi Ngidi | लुंगी एनगिडीसाठी 'ग्रीन कॉरिडॉर' बनवणारा पोलीस अधिकारी निघाला माजी क्रिकेटपटू!; कोहली-गंभीरसोबत गाजवलंय मैदान!

Lungi Ngidi Green Corridor | ८ किमीचे अंतर ११ मिनिटांत कापल्‍याने एनगिडीला मिळाले तत्‍काळ उपचार
Lungi Ngidi Green Corridor ACP Sanjay Singh
एसीपी संजय सिंह माजी क्रिकेटपटू असून त्यांनी विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यासोबत क्रिकेट खेळले आहे.Pudhari
Published on
Updated on

Lungi Ngidi Green Corridor ACP Sanjay Singh

नवी दिल्ली : आयपीएल २०२६ दरम्यान दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी मैदानात क्षेत्ररक्षण करताना गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचार मिळवून देण्यासाठी दिल्ली पोलिसांनी दाखवलेली तत्परता सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एनगिडची प्रकृती आता स्थिर असली, तरी त्याला अवघ्या ११ मिनिटांत रुग्णालयात पोहोचवण्यात एसीपी संजय सिंह यांची भूमिका महत्त्वाची ठरली. विशेष म्हणजे, संजय सिंह हे स्वतः एक माजी क्रिकेटपटू असून त्यांनी विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यासोबत क्रिकेट खेळले आहे.

मैदानात काय घडलं होतं?

अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्यादरम्यान लुंगी एनगिडीच्या मानेला गंभीर दुखापत झाली. मैदानात रुग्णवाहिका आल्याने खेळाडू आणि चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मानेला 'नेक ब्रेस' लावून त्याला रुग्णवाहिकेत हलवण्यात आले.

Lungi Ngidi Green Corridor ACP Sanjay Singh
Lungi Ngidi Injured | लुंगी एनगिडी गंभीर जखमी, क्षेत्ररक्षण करताना डोक्याला दुखापत; स्ट्रेचरवरून नेले मैदानाबाहेर

एसीपी संजय सिंह यांनी 'ग्रीन कॉरिडॉर'चा निर्णय

सायंकाळी ६:१५ ची वेळ असल्याने दिल्लीत प्रचंड वाहतूक कोंडी होती. अशावेळी एसीपी संजय सिंह यांनी 'ग्रीन कॉरिडॉर'चा निर्णय घेतला. स्टेडियम ते राजेंद्र नगर हे अंतर पार करण्यासाठी सुमारे २५-३० मिनिटे लागतात, पण न्गिडीला अवघ्या ११ मिनिटांत बीएलके मॅक्स रुग्णालयात पोहोचवण्यात आले.

Lungi Ngidi Green Corridor ACP Sanjay Singh
IPL 2026 Controversy: चिटिंग करता है रे तू.... पंतची अपील अन् पंचांचा निर्णय; रघुवंशी खरंच आऊट होता, नियम काय सांगतो?

८ किमीचे अंतर ११ मिनिटांत कापले

एसीपी सिंह यांनी स्‍पष्‍ट केले की, "जेव्हा मी रुग्णवाहिकेच्या चालकाला विचारले की तू कसा जाणार? तेव्हा त्याने गुगल मॅप्सचा वापर करणार असल्याचे सांगितले. गर्दीची वेळ असल्याने मी तातडीने नियंत्रण कक्षाला कळवून संपूर्ण मार्गावरील मंडी हाऊससारखे महत्त्वाचे सिग्नल क्लिअर करून घेतले. ८ किमीचे अंतर ११ मिनिटांत कापले गेले."

Lungi Ngidi Green Corridor ACP Sanjay Singh
PSL 2026 controversy | PSL मध्ये राडा! आमिरच्या 'स्लेजिंग'मुळे फहीमचा पारा चढला! मैदानात हाय-व्होल्टेज ड्रामा, पाहा व्हिडिओ

युवराज सिंह, गौतम गंभीर आणि विराट कोहलीसोबत सामने खेळले

संजय सिंह हे स्वतः उत्तम क्रिकेटपटू आहेत. २०१२ पर्यंत ते दिल्ली पोलीस क्रिकेट संघाकडून खेळले आहेत. डीडीसीए लीगमध्ये खेळताना त्यांनी युवराज सिंह, गौतम गंभीर, मोहम्मद कैफ आणि वीरेंद्र सेहवाग यांच्याविरुद्ध किंवा सोबत सामने खेळले आहेत. "विराट कोहली तेव्हा लहान होता, तो देखील खेळायचा. या सर्वांसोबत मी क्रिकेट खेळण्‍याचा अनुभव घेतला आहे," असे सिंह यांनी माध्‍यमांशी बोलताना आवर्जून नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news