PSL 2026 controversy | PSL मध्ये राडा! आमिरच्या 'स्लेजिंग'मुळे फहीमचा पारा चढला! मैदानात हाय-व्होल्टेज ड्रामा, पाहा व्हिडिओ

रावळपिंडी आणि इस्लामाबाद युनायटेड यांच्यातील सामन्यावेळी तणाव
PSL 2026 controversy
पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये गुरुवारी रावळपिंडी आणि इस्लामाबाद युनायटेड यांच्यातील सामन्यादरम्यान मोहम्मद आमिर आणि फहीम अशरफ यांच्यात तीव्र वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले. Pudhari
Published on
Updated on

PSL 2026 controversy

कराची : पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये गुरुवारी रावळपिंडी आणि इस्लामाबाद युनायटेड यांच्यातील सामन्यादरम्यान मोहम्मद आमिर आणि फहीम अशरफ यांच्यात तीव्र वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले. कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात १७ व्या षटकादरम्यान ही घटना घडली. आमिरने फहीमला बाद केल्यानंतर दोघांमधील वाद विकोपाला गेला.

गोलंदाज आणि फलंदाजामध्ये शाब्दिक चकमक

१६.३ षटकांत इस्लामाबादची अवस्था ७ बाद ९९ अशी असताना आमिरने फहीमला एक आखूड टप्प्याचा चेंडू टाकला. फहीमने तो चेंडू सीमापार धाडण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानच्या हातात विसावला. पंचांनी बाद असल्याचा निर्णय दिल्यानंतर गोलंदाज आणि फलंदाज यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली.

PSL 2026 controversy
IPL 2026 | CSK विरुद्ध राडा करणं नितीश राणाला नडलं! BCCI ठोठावला दंड

फहीम आमिरच्या दिशेने बॅट दाखवत अंगावर धावून गेला!

फहीम मैदानातून बाहेर जाण्यास थोडा उशीर करत असताना आमिरने त्याला काही अपशब्द वापरून मैदानाबाहेर जाण्यास सांगितले. आमिरचे हे वर्तन फहीमला आवडले नाही आणि त्यानेही त्याला सडेतोड उत्तर दिले. रागात असलेला फहीम आमिरच्या दिशेने बॅट दाखवत अंगावर धावून गेल्याचेही दिसले. अखेर रावळपिंडीचा कर्णधार शान मसूद आणि आसिफ आफ्रिदी यांनी मध्यस्थी करत दोघांना वेगळे केले.

PSL 2026 controversy
PSL vs IPL Controversy | नक्‍वींसह पाकिस्तान क्रिकेटची पुन्हा जगात ‘अब्रू’ गेली! खेळाडूंपाठोपाठ कॉमेंटेटरही IPL मध्ये जाणार?

सामन्यात काय घडलं?

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या इस्लामाबाद युनायटेडची सुरुवातीची फळी पत्त्यासारखी कोसळली आणि संपूर्ण संघ १३७ धावांत गारद झाला. माजी चॅम्पियन संघातर्फे डेव्हॉन कॉनवेने सर्वाधिक ४० धावा केल्या, तर ख्रिस ग्रीनने १६ चेंडूत २९ धावांची फटकेबाजी करत संघाला एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. रावळपिंडीकडून मोहम्मद आमिरने ४ षटकांत २१ धावा देऊन २ बळी घेतले. शान मसूद आणि डोनोव्हन फरेरा यांनीही प्रत्येकी दोन गडी बाद केले. सलग आठ पराभवांनंतर रावळपिंडीचा संघ आता या मोसमातील पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे.

PSL 2026 controversy
rr vs gt ipl 2026 | खतरनाक स्पीड..! १५४.२ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी; कोण आहे गुजरातचा नवीन 'स्पीड गन' अशोक शर्मा?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news