david warner : 'आयपीएल' जिंकून देणाऱ्या कर्णधाराला SRH ने केलं ब्लॉक! डेव्हिड वॉर्नर केला खुलासा; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

srh blocked david warner on instagram | वॉर्नरने शेअर केला इन्स्टाग्राम स्टोरीवर सनरायझर्स हैदराबादच्या अधिकृत अकाउंटचा स्क्रीनशॉट
srh blocked david warner on instagram
डेव्हिड वॉर्नरच्‍या नेतृत्वाखाली हैदराबादने २०१६ मध्ये आपले पहिले आणि एकमेव आयपीएल जेतेपद पटकावले होते.File Photo.
Published on
Updated on

srh blocked david warner on instagram

हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यातील बिघडलेले संबंध पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरने रविवारी एक धक्कादायक खुलासा केला. सनरायझर्स हैदराबादने त्याला अजूनही इन्स्टाग्रामवर ब्लॉक करून ठेवल्याचं वॉर्नरनं म्हटलं आहे.

वॉर्नरने शेअर केला अधिकृत अकाउंटचा स्क्रीनशॉट

वॉर्नरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सनरायझर्स हैदराबादच्या अधिकृत अकाउंटचा एक स्क्रीनशॉट शेअर केला, ज्यामध्ये हे अकाउंट 'प्रायव्हेट' दिसत होते. सामान्यतः एखाद्या युझरला ब्लॉक केल्यावरच असं दिसतं. हा स्क्रीनशॉट शेअर करत वॉर्नरने चाहत्यांना पोलद्वारे विचारले की, 'हे खरंच सनरायझर्स हैदराबादचे अधिकृत अकाउंट आहे का?'

srh blocked david warner on instagram
T20 Captain: सूर्यकुमार यादवची टी-20 कर्णधारपदावरून हकालपट्टी? श्रेयस नाही, तर ‘हा’ खेळाडू बनणार नवा कॅप्टन
Pudhari

चाहत्याच्या प्रश्नावर वॉर्नरचं उत्तर व्हायरल

हा प्रकार समोर आल्यानंतर एका चाहत्याने वॉर्नरच्या इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट करत हैदराबादने त्याला अनब्लॉक करण्याचा सल्ला दिला. यावर उत्तर देताना वॉर्नरने लिहिले, 'ते मला कधीच अनब्लॉक करणार नाहीत.' वॉर्नरची ही कमेंट आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

srh blocked david warner on instagram
IPL 2026 | 'डिअर क्रिकेट, मला आणखी एक संधी दे' : करुण नायरची 'ती' जुनी पोस्ट का होतीय व्हायरल?

हैदराबादसोबतचा वॉर्नरचा प्रवास ठरला होता यशस्वी

सध्या दोन्ही बाजूंचे संबंध कमालीचे ताणलेले असले, तरी डेव्हिड वॉर्नर आणि सनरायझर्स हैदराबादची जोडी आयपीएल (IPL) इतिहासातील सर्वात यशस्वी भागीदारी मानली जाते. वॉर्नर २०१४ मध्ये या संघात सामील झाला होता आणि अल्पावधीतच तो संघाचा मुख्य फलंदाज बनला. २०१५ मध्ये त्याच्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. त्याच्याच नेतृत्वाखाली हैदराबादने २०१६ मध्ये आपले पहिले आणि एकमेव आयपीएल जेतेपद पटकावले होते. त्या हंगामात वॉर्नरने फलंदाजीत दमदार कामगिरी करत संघाला चॅम्पियन बनवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्याने हैदराबादकडून खेळताना तब्बल तीन वेळा ऑरेंज कॅप (२०१५, २०१७ आणि २०१९) जिंकली होती.

srh blocked david warner on instagram
IPL 2026 | 'त्याला तुरुंगात टाकायला हवे' : युझवेंद्र चहलच्या व्हायरल 'वेप' व्हिडिओवर माजी क्रिकेटपटू भडकला

SRH साठीची दमदार आकडेवारी

डेव्हिड वॉर्नरने हैदराबादसाठी ९५ सामन्यांमध्ये ४९.५६ च्या उत्कृष्ट सरासरीने ४,०१४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतके आणि ४० अर्धशतकेही झळकावली. वॉर्नर केवळ त्याच्या मैदानावरील कामगिरीमुळेच नाही, तर तेलगू चित्रपटांमधील गाणी आणि संवादांवर (Reels) बनवलेल्या मजेशीर व्हिडिओंमुळेही 'ऑरेंज आर्मी'च्या (हैदराबादच्या चाहत्यांमध्ये) गळ्यातील ताईत बनला होता.

srh blocked david warner on instagram
Virender Sehwag |"भारतीय संघात जागा आहे कुठे?" : श्रेयस अय्यर, पडिक्कलच्‍या टीम इंडियातील निवडीवर सेहवाग काय म्‍हणाला?

२०२१ मध्ये संबंध बिघडले

वॉर्नर आणि हैदराबाद व्यवस्थापनातील वादाची ठिणगी २०२१ च्या हंगामात पडली. खराब फॉर्म आणि संघाच्या सलग पराभवांमुळे फ्रँचायझीने हंगामाच्या मध्य्यातच वॉर्नरकडून कर्णधारपद काढून घेतले होते. त्याला प्लेइंग इलेव्हनमधूनही डच्चू देण्यात आला. युएई (UAE) मध्ये झालेल्या सामन्यांदरम्यान तो अनेकदा संघाच्या डगआउटमध्ये न बसता स्टँड्समध्ये एकटाच बसलेला दिसला होता. यावरून दोघांमधील दरी किती वाढली आहे, हे स्पष्ट झाले होते. अखेर २०२२ च्या मेगा लिलावापूर्वी हैदराबादने वॉर्नरला रिलीज केले आणि त्याचा हैदराबादमधील प्रवास संपला.

srh blocked david warner on instagram
BCCI On Girlfriend Culture: बीसीसीआय 'गर्लफ्रेंड कल्चर'वर कडक कारवाई करणार.. डोकेदुखी ठरण्याआधीच वेळेआधीच नियम केलेला बरा

यापूर्वीही केला होता खुलासा

विशेष म्हणजे, डिसेंबर २०२३ मध्येही वॉर्नरने असाच एक खुलासा केला होता. पॅट कमिन्स आणि ट्रेव्हिस हेड यांना हैदराबादने लिलावात मोठी बोली लावून खरेदी केले होते. तेव्हा या ऑस्ट्रेलियन सहकाऱ्यांचे अभिनंदन करण्यासाठी वॉर्नर हैदराबादच्या सोशल मीडिया पेजवर गेला असता, फ्रँचायझीने आपल्याला ब्लॉक केल्याचे त्याच्या लक्षात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news