Dhoni Jersey No. 7 Retirement : धोनीपाठोपाठ 7 क्रमांकाची जर्सीही निवृत्त! 'थाला'च्या सन्मानार्थ CSK फ्रँचायझीचा मोठा निर्णय

IPL मधील सुवर्ण युगाचा शेवट, खेळाडू म्हणून निरोप.. पण 'मेंटर' म्हणून MS Dhoni ची सोबत कायम
MS Dhoni Jersey No. 7 Retirement  CSK Big Decision
Published on: 
Updated on: 

MS Dhoni Jersey No. 7 Retirement CSK Big Decision

दुबई : आयपीएलच्या २०२७ च्या हंगामासाठी महेंद्रसिंग धोनीला संघात कायम न ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आता चेन्नई सुपर किंग्स (CSK) व्यवस्थापनाने त्याच्या सन्मानार्थ त्याची सुप्रसिद्ध ७ क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. गेल्या जवळपास दोन दशकांपासून या संघाचा अविभाज्य भाग बनलेल्या आणि पाच वेळा अजिंक्यपद मिळवून देणाऱ्या या महान खेळाडूचा हा एक अत्यंत सार्थ सन्मान ठरणार आहे.

MS Dhoni Jersey No. 7 Retirement  CSK Big Decision
MS Dhoni IPL Retirement : IPL मधून निवृत्तीनंतर धोनीला किती मिळणार पेन्शन? BCCIकडून दरमहा मिळणाऱ्या मानधनाचे गणित जाणून घ्या

मंगळवारी (दि. १७) धोनीच्या आयपीएलमधील निवृत्तीवर अधिकृत शिक्कामोर्तब झाले असून, या स्पर्धेतील त्याच्या देदीप्यमान कारकिर्दीचा अध्याय संपुष्टात आला आहे. मात्र, भारतीय संघाचा हा माजी कर्णधार आगामी काळातही चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्याशी जोडलेला राहणार असून, २०२७ च्या हंगामापूर्वी तो संघाचा 'मेंटॉर' (मार्गदर्शक) म्हणून नवी जबाबदारी स्वीकारणार आहे. आगामी हंगामासाठी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्याच्या काही तास आधीच ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली.

MS Dhoni Jersey No. 7 Retirement  CSK Big Decision
MS Dhoni IPL Retirement: MS धोनीची IPL मधूनही निवृत्ती! CSK मध्ये नव्या भूमिकेत दिसणार, मेंटर म्हणून सांभाळणार जबाबदारी

सीएसकेने एका अधिकृत निवेदनाद्वारे धोनीच्या निवृत्तीबाबत दुजोरा दिला असून, संघाच्या यशातील त्याचे मोठे योगदान आणि संघाच्या ओळखीतील त्याचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, ‘एमएस धोनी चेन्नई सुपर किंग्सच्या 'टीम मेंटॉर' पदाची सूत्रे हाती घेत आहे. अविस्मरणीय विजय, आव्हानात्मक काळ आणि मनात कायमच्या घर करून राहिलेल्या आठवणींच्या या प्रवासात एमएस सुरुवातीपासूनच आमच्या हृदयाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. संघाला यशाच्या शिखरावर नेण्यापासून ते सुपर किंग्सच्या पुढच्या पिढीला मार्गदर्शन करण्यापर्यंत, 'थाला' नेहमीच आमच्या फ्रँचायझीचा आणि संघाचा भाग राहील. चेन्नई हे सदैव त्याचे घर असेल.’

MS Dhoni Jersey No. 7 Retirement  CSK Big Decision
Mohammed Shami IPL 2027: मोहम्मद शमी आता राजस्थानी... लखनौची 2 कोटींच्या 'सॅम करन'साठी दोन खेळाडूंची कुरबानी

सीएसकेचे मालक एन. श्रीनिवासन यांनीही ४५ वर्षीय धोनीच्या प्रदीर्घ प्रवासाचा गौरव करत २००८ मध्ये त्याला संघात घेण्याच्या निर्णयाच्या आठवणींना उजाळा दिला. आपल्या भावना व्यक्त करताना श्रीनिवासन म्हणाले की, ‘एमएस धोनीशिवाय सीएसकेची कल्पनाच करता येऊ शकत नाही. गेल्या जवळपास दोन दशकांपासून आम्ही विजयाचे सोहळे, कठीण प्रसंग आणि प्रत्येक चढ-उतारात एकत्र वाटचाल केली असून एकत्रच घडलो आहोत. आमचे नाते इतके घट्ट असण्यामागे एकच कारण आहे, ते म्हणजे आम्ही कधीही एकमेकांच्या हेतूवर शंका घेत नाही. याच विश्वासाने हा प्रवास शक्य केला. २००८ मध्ये धोनी सीएसकेचा भाग असावा यासाठी मी आग्रही होतो आणि तो माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय ठरला. केवळ त्याने संघासाठी मिळवलेल्या यशामुळे नव्हे, तर तो एक माणूस म्हणून कसा आहे यावरून हे सिद्ध होते. धोनी नेहमीच सीएसकेचा भाग राहील आणि हेच त्याचे कायमस्वरूपी घर असेल.’

२००८ मधील आयपीएलच्या पहिल्याच हंगामापूर्वी सीएसकेने धोनीला तत्कालीन विक्रमी ६ कोटी रुपये मोजून संघात सामील करून घेतले होते. अल्पावधीतच तो संघाचा मुख्य चेहरा बनला आणि त्याने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी पर्वाचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने २०१०, २०११, २०१८, २०२१ आणि २०२३ अशी पाच वेळा आयपीएलची विजेतेपदे पटकावली. याशिवाय, २०१० आणि २०१४ मध्ये दोनदा चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेचे अजिंक्यपदही त्याने संघाला मिळवून दिले.

MS Dhoni Jersey No. 7 Retirement  CSK Big Decision
Travis Head IPL 2027: देशासाठी ट्रेविस हेडने सोडले 14 कोटी रुपये; IPL मधून अचानक माघार का घेतली? कारण ऐकून व्हाल थक्क

सीएसकेसाठी सर्वाधिक २७२ सामने खेळणारा खेळाडू म्हणून धोनीने निरोप घेतला असून, ५,३१४ धावांसह तो संघाचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. चाहत्यांना आता पिवळ्या जर्सीत धोनी मैदानावर खेळताना दिसणार नसला, तरी नव्या भूमिकेतून त्याचा प्रभाव कायम राहणार आहे. सीएसके आपल्या संग्रहात आणखी ट्रॉफींची भर घालण्यासाठी सज्ज होत असताना, 'मेंटॉर' म्हणून धोनीवर संघाच्या भावी पिढीला घडवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.