

Chris Gayle Unbreakable T20 Records: टी20 क्रिकेटचं नाव घेतलं की डोळ्यांसमोर एकच खेळाडू उभा राहतो तो म्हणजे वेस्ट इंडिजचा धडाकेबाज ओपनर क्रिस गेल. जगभरातील लीगमध्ये फलंदाजांनी कितीही मोठी कामगिरी केली, तरी गेलचा रेकॉर्ड आज कोणीही मोडू शकत नाही.
टी20 क्रिकेटमध्ये त्याने बनवलेले रेकॉर्ड एवढे प्रचंड आहेत की त्याची कल्पनाही करवत नाही. 1,056 सिक्सेस, 22 शतकं आणि तब्बल 14,562 धावा! हा आकडा पाहूनच कळतं की टी20 हा फॉरमॅट ‘यूनिव्हर्स बॉस’चाच आहे.
क्रिस गेलनं आजपर्यंत खेळलेल्या 463 टी20 सामन्यांत 36.22 च्या सरासरीने 14,562 धावा केल्या आहेत. हा आकडा कुठल्याही फलंदाजासाठी गाठणं खूपचं मोठी गोष्ट आहे. गेलने टी20 क्रिकेटमध्ये 1056 सिक्सेस ठोकले, हा विक्रम इतका प्रचंड आहे की त्याच्या जवळपासही कुणी पोहोचलेलं नाही.
टी20सारख्या वेगवान खेळात शतक होणं अवघड मानलं जातं. मात्र गेलने 22 वेळा हा आकडा गाठला आहे. ही संख्या नव्हे, तर गेलच्या धडाकेबाज शैलीचं जिवंत उदाहरण आहे.
2013 च्या IPL मध्ये RCB कडून खेळताना पुणे वॉरियर्सविरुद्ध गेलने केलेले 175 रन्स आजही टी20 इतिहासातील सर्वात मोठा वैयक्तिक स्कोर आहे. फक्त 30 चेंडूंत शतक झळकावणारा गेल हा क्रिकेट जगतातील एकमेव खेळाडू आहे.
त्या सामन्यात त्याने:
13 चौकार
17 सिक्सेस
असा प्रचंड विक्रम केला आणि टी20चा चेहराच बदलून टाकला.
गेलची शारीरिक ताकद, चेंडू मारण्याची टाइमिंग, बॉलर्सवर मानसिक दडपण निर्माण करण्याची कला आणि सतत आक्रमक मानसिकता, या सर्व गुणांचं मिश्रण आज कोणत्याच खेळाडूकडे नाही. त्यामुळे त्याचे विक्रम मोडणं पुढील अनेक वर्षं कठीणच राहणार आहे.
क्रिस गेल फक्त एक खेळाडू नाही, तर टी20 क्रिकेटचा ‘अध्याय’ आहे. त्याचं नाव घेतलं की फोर -सिक्सेसचा आवाज कानात घुमतो. 1056 सिक्सेस, 22 शतकं आणि 14,562 धावा, हा विक्रम भविष्यात कुणी मोडेल की नाही माहित नाही, पण त्याच्या जवळ जाणंही एक वेगळंच आव्हान आहे.