Asian Para Games: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूवर गंभीर आरोप; महिला कर्मचाऱ्यावर जबरदस्ती, जपान पोलिसांनी केली कारवाई, काय घडलं?

Asian Para Games Swimmer Allegations: तक्रारीनंतर जपान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि मंगळवारी भारतात परत पाठवले. त्यामुळे त्यांना स्पर्धेत सहभागी होता आले नाही.
Asian Para Games Swimmer Allegations
Asian Para Games Swimmer AllegationsPudhari
Published on: 
Updated on: 

Asian Para Games Swimmer Allegations: जपानमध्ये सुरू असलेल्या २०२६ च्या आशियाई पॅरा गेम्सदरम्यान भारतीय पॅरा जलतरणपटू मोहम्मद शम्स आलम शेख यांच्यावर महिला हॉटेल कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर जपान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि मंगळवारी भारतात परत पाठवले. या घटनेनंतर भारतीय पॅरालिम्पिक समिती (PCI) त्यांच्यावर आजीवन बंदी घालण्याच्या विचारात आहे.

नेमकी घटना काय घडली?

ही घटना भारतीय पॅरा जलतरण संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला होता, तिथे घडली. हॉटेलमधील महिला कर्मचारी शेख यांच्या खोलीत साफसफाईचे काम करत असताना हा प्रकार घडल्याचा आरोप आहे.

या घटनेबाबत हॉटेल कर्मचाऱ्याने तक्रार केल्यानंतर प्रकरण स्थानिक आयोजन समिती आणि भारतीय पथकातील अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले. आयोजन समितीनेही भारतीय अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती दिली.

त्यानंतर जपान पोलिसांनी शेख यांना ताब्यात घेतले. दुसऱ्याच दिवशी, म्हणजे मंगळवारी, त्यांना भारतात परत पाठवण्यात आले. या प्रकरणामुळे त्यांना आशियाई पॅरा गेम्समधील नियोजित स्पर्धांमध्ये सहभागी होता आले नाही.

शेख यांच्यावर आजीवन बंदीची शक्यता

या घटनेनंतर भारतीय पॅरालिम्पिक समिती शेख यांच्याविरोधात कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या विचारात आहे. त्यांच्यावर आजीवन बंदी घालण्याचा प्रस्तावही विचाराधीन असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. आशियाई पॅरा गेम्स संपल्यानंतर या प्रकरणाचा आढावा घेतला जाऊ शकतो. त्यानंतर समितीकडून पुढील कारवाईबाबत औपचारिक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Asian Para Games Swimmer Allegations
Steve Smith 11000 Test Runs Record : स्टीव्ह स्मिथ@ ११,०००! कसोटी क्रिकेटमध्ये राहुल द्रविडला टाकले मागे

कोण आहेत मोहम्मद शम्स आलम शेख?

मोहम्मद शम्स आलम शेख हे बिहारमधील असून भारतीय पॅरा जलतरण क्षेत्रातील अनुभवी खेळाडू म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. माहितीनुसार, त्यांनी पुरुषांच्या १०० मीटर बटरफ्लाय एस५ आणि ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक एसबी४ या प्रकारांमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले होते.

Asian Para Games Swimmer Allegations
Indian Archery: महाराष्ट्रातील युवा तिरंदाजांच्या संघर्षाची सुवर्ण यशोगाथा

२०१८ मध्ये इंडोनेशियातील जकार्ता येथे झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत त्यांनी ब्रेस्टस्ट्रोक प्रकारातील २०० मीटर आणि ५० मीटर शर्यतींमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

त्यानंतर २०२५ मध्ये आइसलँडमधील रेक्याविक आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही त्यांनी २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात सुवर्णपदक पटकावले.

२०२६ मध्ये जपानमधील नागोया येथे होणाऱ्या आशियाई पॅरा गेम्समध्ये ते सलग तिसऱ्यांदा सहभागी होणार होते. मात्र, त्यांच्यावरील आरोप आणि त्यानंतर झालेल्या कारवाईमुळे त्यांना स्पर्धेत सहभागी न होताच भारतात परतावे लागले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news