Steve Smith 11000 Test Runs Record : स्टीव्ह स्मिथ@ ११,०००! कसोटी क्रिकेटमध्ये राहुल द्रविडला टाकले मागे

सर्वात कमी डावांत ११,००० कसोटी धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाचव्या स्थानावर
Steve Smith 11000 Test Runs Record
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये ११,००० धावांचा टप्पा ओलांडला आहे. Pudhari News
Published on: 
Updated on: 

Steve Smith 11000 Test Runs Record : ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये ११,००० धावांचा टप्पा ओलांडला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ११,००० किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो तिसरा ऑस्ट्रेलियन आणि एकूण १२ वा क्रिकेटपटू ठरला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाची पडझड...

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गकेबरहा येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाची मोठी पडझड झाली आहे. बुधवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियन फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. संघावर फॉलोऑनची नामुष्की ओढवली. यजमान दक्षिण आफ्रिकेच्या ४२५ धावांच्या (९ बाद घोषित) प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या ४२.३ षटकांत ९९ धावांत आटोपला. यामुळे दक्षिण आफ्रिकेने ३२६ धावांची भक्कम आघाडी घेतली आहे.

Steve Smith 11000 Test Runs Record
Steve Smith : यशस्वी फील्डर..! स्टीव्ह स्मिथने द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत मोडला जो रूटचा ऐतिहासिक विक्रम

स्मिथने ओलांडला कसोटी क्रिकेटमध्ये ११ हजार धावांचा टप्पा

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघाचा अनुभवी फलंदाज स्टीव स्मिथने संघर्ष करताना ८८ चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने २८ धावा केल्या. वियान मुल्डरने ४१ व्या षटकांत त्याला क्लिन बोल्ड केले. यादरम्यान ३७ वर्षीय स्मिथने आपल्या डावातील २८ वी धाव पूर्ण करताच कसोटी क्रिकेटमध्ये ११ हजार धावांचा टप्पा सर केला. कसोटी इतिहासात ११ हजार किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो ऑस्ट्रेलियाचा तिसरा आणि जगातील एकूण १२ वा फलंदाज ठरला आहे. स्मिथ गकेबरहा येथे आपल्या कारकिर्दीतील १२७ वा कसोटी सामना खेळत आहे.

राहुल द्रविडला टाकले मागे

कसोटी क्रिकेटमध्ये डावांच्या बाबतीत सर्वात जलद ११ हजार धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या एलिट यादीत स्टीव स्मिथ पाचव्या स्थानी पोहोचला आहे. त्याने २२६ डावांत हा पल्ला गाठला आहे. या कामगिरीसह स्मिथने भारताचे माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविड आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी अष्टपैलू जॅक कॅलिस यांना मागे सोडले आहे. या दोन्ही दिग्गजांनी २३४ डावांत ११ हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

Steve Smith 11000 Test Runs Record
PSL 2026 security threat | "पीएसएल मधून तत्‍काळ माघार घ्या" : पाकमधील सशस्त्र गटाची डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथला धमकी

सचिन तेंडुलकर स्मिथच्या पुढेच

भारताचे महान फलंदाज सचिन तेंडुलकर या यादीत स्मिथच्या पुढेच राहिले असून, ते थोडक्यात मागे पडण्यापासून वाचले आहेत. सचिनने २२३ डावांत हा विक्रम केला होता. श्रीलंकेचे माजी यष्टीरक्षक-फलंदाज कुमार संगकारा या यादीत अव्वल स्थानी असून त्याने अवघ्या २०८ डावांत ११ हजार कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या. त्याच्यापाठोपाठ ब्रायन लारा (२१३ डाव) आणि रिकी पोंटिंग (२२२ डाव) यांचा क्रमांक लागतो.

Steve Smith 11000 Test Runs Record
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीबाबत कॅप्टन श्रेयस अय्यरचं 'ते' एक वाक्य... अन् क्रिकेटविश्वात चर्चांना उधाण!

कसोटीत सर्वात जलद ११,००० धावा (डावांच्या आधारे)

  • २०८ - कुमार संगकारा (श्रीलंका)

  • २१३ - ब्रायन लारा (वेस्ट इंडीज)

  • २२२ - रिकी पोंटिंग (ऑस्ट्रेलिया)

  • २२३ - सचिन तेंडुलकर (भारत)

  • २२६ - स्टीव स्मिथ (ऑस्ट्रेलिया)

  • २३४ - राहुल द्रविड (भारत)

  • २३४ - जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका)

  • २३७ - महेला जयवर्धने (श्रीलंका)

  • २३८ - जो रूट (इंग्लंड)

  • २५२ - एलिस्टर कुक (इंग्लंड)

  • २५६ - शिवनारायण चंद्रपॉल (वेस्ट इंडीज)

  • २५९ - ॲलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया)

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज (सामन्यांची संख्या)

१५,९२१ — सचिन तेंडुलकर (२००)

१४,२७८ — जो रूट (१६९)

१३,३७८ — रिकी पोंटिंग (१६८)

१३,२८९ — जॅक कॅलिस (१६६)

१३,२८८ — राहुल द्रविड (१६४)

१२,४७२ — एलिस्टर कुक (१६१)

१२,४०० — कुमार संगकारा (१३४)

११,९५३ — ब्रायन लारा (१३१)

११,८६७ — शिवनारायण चंद्रपॉल (१६४)

११,८१४ — महेला जयवर्धने (१४९)

११,१७४ — ॲलन बॉर्डर (१५६)

११,००० — स्टीव स्मिथ (१२७)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news