Asian Para Games 2026 : निषाद कुमारची सुवर्णपदकांची ‘डबल धमाका’; आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताचा डंका , पदकांची संख्या ३५ वर!

स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी पाडला पदकांचा पाऊस
Asian Para Games 2026
Asian Para Games 2026 : स्टार अ‍ॅथलीट निषाद कुमारने ऐतिहासिक कामगिरी करत एकाच पर्वात दोन सुवर्णपदके नावावर केली आहेत,
Published on: 
Updated on: 

Asian Para Games 2026 India Medal Tally : आशियाई पॅरा गेम्स २०२६ मध्ये भारताच्या सुवर्णमोहिमे वेगावली आहे. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी ट्रॅक आणि फिल्डवर वर्चस्व गाजवत पदकांचा पाऊस पाडला आहे. स्टार अ‍ॅथलीट निषाद कुमारने ऐतिहासिक कामगिरी करत एकाच पर्वात दोन सुवर्णपदके नावावर केली आहेत, तर भारताची एकूण पदकसंख्या ३५ च्या पुढे पोहोचली असून गुणतालिकेत भारताने ६ वे स्थान पटकावले आहे.

निषाद कुमारचा ऐतिहासिक पराक्रम

निषाद कुमारने पुन्हा एकदा आपल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर देशाची मान उंचावली आहे. त्याने पुरुषांच्या T47 उच्च उडी (हाय जंप) प्रकारात सुवर्णपदक पटकावले. विशेष म्हणजे, याआधी दुसऱ्याच दिवशी त्याने लांब उडीतही (लॉन्ग जंप) सुवर्णपदक जिंकले होते. या ऐतिहासिक कामगिरीसह एकाच आशियाई पॅरा गेम्समध्ये दोन सुवर्णपदके जिंकणारा तो भारताचा केवळ तिसरा खेळाडू ठरला आहे.

Asian Para Games 2026
Sheetal Devi Record : शीतल देवीची 'शक्ती'..! अचूक 'लक्ष्य' वेधत जागतिक विक्रमाशी केली बरोबरी

एथलेटिक्समध्ये भारताचा दबदबा

तिसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी पदकांच्या रथाची घोडदौड अशीच सुरू ठेवली. पुरुष चक्काफेकच्या F44/64 प्रकारात तर भारताच्याच खेळाडूंनी तिन्ही पदकांवर ताबा मिळवला, ज्यामध्ये देवेंद्र कुमारने सुवर्णपदकास गवसणी घातली.अनुभवी धावपटू सिमरनने ट्रॅकवर आपला दरारा कायम राखत भारताला सहावे सुवर्णपदक मिळवून दिले.पुरुषांच्या F51/52/53 प्रकारात प्रणव सूरमायने चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

दीप्ति जीवनजी आणि मोना अग्रवालचे सोनेरी यश

महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत दीप्ति जीवनजीने सुवर्णपदक जिंकून भारताच्या सुवर्णपदकांच्या मालिकेत मोलाची भर घातली आहे. आत्तापर्यंत भारताने जिंकलेल्या सुवर्णपदकांमध्ये अथालेटिक्सचा वाटा आहे, तर पॅरा शूटिंगमध्ये मोना अग्रवालनेही देशासाठी सुवर्णपदक जिंकले आहे.

Asian Para Games 2026
Asian Para Games 2026 : संकटांना लाथाडून ७.११ मीटरची ऐतिहासिक झेप! निषाद कुमारने पटकावले सुवर्णपदक

तिसर्‍या दिवशी भारताच्‍या खात्‍यात ५ सुवर्णपदके

दुसऱ्या दिवशी ४ सुवर्णपदकांसह तब्बल ११ पदके जिंकणाऱ्या भारताने तिसऱ्या दिवशी (२० ऑक्टोबर) आणखी ५ सुवर्णपदके आपल्या खात्यात जमा केली. सध्या भारताकडे एकूण ९ सुवर्णपदकांसह ३५ हून अधिक पदके जमा झाली असून, संघाने पदक तालिकेत मजबूत मुसंडी मारत सहावे स्थान पटकावले आहे.

Pudhari

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news