Lovlina Borgohain Asian Games : चीनच्या बॉक्सिंगपटूला चारही मुंड्या चित करत लोव्हलिनाचा 'गोल्डन पंच'

नौकायनमधील 'डिंगी'त नेत्रा कुमानननेही पटकावले कांस्य
Lovlina Borgohain Asian Games 2026 gold medal
बॉक्‍सर लोव्‍हलिना बोर्गोहेनने आशियाई क्रीडा स्‍पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे.Pudhari
Published on: 
Updated on: 

Lovlina Borgohain Asian Games 2026 gold medal

भारताची 'स्‍टार' बॉक्‍सर अशी ओळख असणार्‍या लोव्‍हलिना बोर्गोहेनने आशियाई क्रीडा स्‍पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. महिलांच्‍या ७५ किलो वजनी गटातील बॉक्सिंग स्पर्धेत तिने चीनच्या बाओ झियीचा ५-० असा एकर्फी पराभव केला.

सर्व फेर्‍यांमध्‍ये लोव्हलिनाचा डंका

अंतिम सामन्‍यात लोव्‍हलिनाने संयमाने चीनची प्रतिस्‍पर्धी बाओ झियाला केवळ रोखलेच नाही तर प्रभावी 'काउंटर-पंच' मारून प्रत्युत्तर दिले. बाओने अधिक आक्रमकपणे पुढे येण्याचा प्रयत्न केला; परंतु लोव्हलिना अधिक आत्मविश्वासपूर्ण आक्रमकपणे प्रभावी 'पंच' मारले. लोव्हलिनाने दुसरा राऊंड ४-१ ने जिंकला, ज्यामुळे एक राऊंड बाकी असताना तिला एकूण २-० अशी आघाडी मिळाली. यानंतर तिसऱ्या राऊंडवरही वर्चस्व राखले आणि एक दमदार विजय साकारला.

Lovlina Borgohain Asian Games 2026 gold medal
Asian Games IND vs PAK Hockey : पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारतीय हॉकी संघाची फायनलमध्ये धडक
Lovlina Borgohain Asian Games 2026 gold medal
IND vs PAK Asian Games Gold Medal: भारत - पाक 'सुवर्ण' सामना.. कधी अन् कुठं पाहायचा; पाऊस पडल्यास कोणाला मिळणार गोल्ड?

नौकायनमधील 'डिंगी'त नेत्रा कुमाननने पटकावले कांस्य

भारताच्या नेत्रा कुमाननने महिलांच्या 'डिंगी' सेलिंग (नौकायन) प्रकारात कांस्यपदक पटकावले. पहिल्या कठीण शर्यतीनंतर, नेत्राने शानदार पुनरागमन करत दुसरी अंतिम शर्यत जिंकली. तिचे आणि हाँगकाँगच्या स्टेफनी लुईस नॉर्टनचे गुण समान झाले, परंतु नॉर्टनविरुद्धच्या सरस 'हेड-टू-हेड' कामगिरीमुळे नेत्राने कांस्यपदक आपल्या नावे केले.

Lovlina Borgohain Asian Games 2026 gold medal
Asian Games Ishan Kishan : नंबर ५ वर येऊन ठोकल्या नाबाद ८० धावा! ईशान किशनने उद्ध्वस्त केला ८ वर्षांपूर्वीचा विक्रम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news