Asian Games Ishan Kishan : नंबर ५ वर येऊन ठोकल्या नाबाद ८० धावा! ईशान किशनने उद्ध्वस्त केला ८ वर्षांपूर्वीचा विक्रम

ईशान किशनचा ऐतिहासिक पराक्रम! ८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढत अनेक दिग्गजांना टाकले मागे
Ishan Kishan Record Asian Games 2026
Published on: 
Updated on: 

Asian Games Ishan Kishan 2026 Ishan Kishan Record : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये अखेर भारतीय संघाला मैदानात उतरण्याची संधी मिळाली. उपांत्य फेरीच्या महत्त्वपूर्ण सामन्यात भारतीय संघाचा मुकाबला श्रीलंकेशी झाला. या सामन्यात टीम इंडियाने एकतर्फी वर्चस्व गाजवत श्रीलंकेचा तब्बल १२४ धावांनी धुव्वा उडवला आणि सुवर्णपदकाच्या लढतीत दिमाखात प्रवेश केला. आता ३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी रंगणार आहे.

या उपांत्य लढतीत भारताचा स्फोटक फलंदाज ईशान किशनच्या फलंदाजीची जादू पाहायला मिळाली. सध्या उत्कृष्ट फॉर्मात असलेल्या ईशानने श्रीलंकेविरुद्धही आपली हीच लय कायम राखत नाबाद ८० धावांची वादळी खेळी साकारली. या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर त्याने तब्बल ८ वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक कीर्तिमान मोडीत काढत अनेक दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे.

Ishan Kishan Record Asian Games 2026
Shreyas Iyer : कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरने एम.एस. धोनीला मागे टाकले; सलग सर्वाधिक T-20 आंतरराष्ट्रीय विजयाची नोंद

सध्या आंतरराष्ट्रीय टी-२० फलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत ईशान किशन अव्वल स्थानी विराजमान आहे. त्याने उपांत्य सामन्यात मोक्याच्या क्षणी नाबाद ८० धावा ठोकत भारतीय संघाकडून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाचव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारण्याचा मान मिळवला. यापूर्वी हा विक्रम मनीष पांडेच्या नावावर होता; ज्याने २०१८ मध्ये सेंच्युरियन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद ७९ धावांची खेळी केली होती.

भारतासाठी पाचव्या किंवा त्यापुढील क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता ईशान किशन (८०* वि. श्रीलंका, २०२६) अव्वल स्थानी पोहोचला आहे. या विक्रमी यादीत मनीष पांडे (७९* वि. दक्षिण आफ्रिका, २०१८) दुसऱ्या स्थानी, युवराज सिंग (७७* वि. ऑस्ट्रेलिया, २०१३) तिसऱ्या स्थानी, हार्दिक पंड्या (७१* वि. ऑस्ट्रेलिया, २०२२) चौथ्या स्थानी, तर रिंकू सिंहने अनुक्रमे अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद ६९ (२०२४) आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद ६८ (२०२३) धावांसह या यादीत स्थान कायम राखले आहे.

Ishan Kishan Record Asian Games 2026
India vs Sri Lanka: इशान-वैभवचा धमाका.. टीम इंडिया सुवर्ण पदकापासून एक पाऊल दूर, लंकेचा उडवला धुव्वा

दुसरीकडे, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध धावांच्या फरकाने आपल्या सर्वात मोठ्या टी-२० विजयाची नोंद केली. यापूर्वी भारताने २०१७ मध्ये कटकच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध ९३ धावांनी सर्वात मोठा विजय मिळवला होता, तो विक्रम आता भारताने मागे टाकला आहे. तसेच, श्रीलंकेच्या संघाचा आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १०० किंवा त्यापेक्षा जास्त धावांच्या फरकाने झालेला हा तिसरा मोठा पराभव ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news