

दुबई : भारताचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ यांना संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेत ‘आयसीसी’च्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मंगळवारी दोषी ठरवण्यात आले असून, यावरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
भारताविरुद्धच्या सामन्यांदरम्यान घडलेल्या 2 वेगवेगळ्या घटनांसाठी रौफवर प्रत्येकी 30 टक्क्यांचे दोन आर्थिक दंड ठोठावण्यात आले. शिवाय, 2 सामन्यांतून त्याला निलंबित केले. यामुळे, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या वन-डे मालिकेतील 2 सामन्यांत तो खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारतीय कर्णधार सूर्यकुमारलाही, ‘खेळाची प्रतिमा मलीन केल्याबद्दल’ सामना शुल्काच्या 30 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. सूर्यकुमारने भारतीय सशस्त्र दलांना पाठिंबा देत पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांप्रती संवेदना व्यक्त केल्या होत्या.
आयसीसीने खेळाडूंनी आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन केले असून, अशा घटनांमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानावर तणाव वाढू शकतो. त्यामुळे त्या टाळणे आवश्यक असल्याचा सूचना केल्या.