IND vs Pak Asia Cup : भारत की पाकिस्तान.. आशिया चषकात कोणाचे पारडे जड? जाणून घ्या आकडेवारी

पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी टीम इंडिया सज्ज
IND vs Pak Asia Cup : भारत की पाकिस्तान.. आशिया चषकात कोणाचे पारडे जड? जाणून घ्या आकडेवारी
Published on
Updated on

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील संघर्ष हा जगातील सर्वात जुन्या व तीव्र क्रीडा प्रतिस्पर्धेत गणला जातो. जेव्हा जेव्हा हे दोन्ही संघ आमने-सामने उभे ठाकतात, तेव्हा तो केवळ एक सामना नसून तो इतिहास, भावना आणि अपेक्षा यांचा संघर्ष असतो.

आता १४ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये होणारी आशिया चषक स्पर्धेतील लढत पुन्हा एकदा चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवणार आहे. आकडेवारीपासून ते सध्याच्या कामगिरीपर्यंत भारताचे पाकिस्तानवर पारडे जड असल्याचे दिसून येते. परंतु हा हायव्होल्टेज सामना असून इथे प्रत्येक षटक आणि प्रत्येक धाव एक नवा इतिहास रचते.

IND vs Pak Asia Cup : भारत की पाकिस्तान.. आशिया चषकात कोणाचे पारडे जड? जाणून घ्या आकडेवारी
IND vs PAK Asia Cup : ५ फलंदाज, ३ अष्टपैलू, ३ गोलंदाज… पाकिस्तानविरुद्ध ‘असा’ असणार भारताचा संभाव्य संघ

आयसीसी स्पर्धांमध्ये पाकिस्तानवर भारताचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या १६ विश्वचषक सामन्यांपैकी १५ सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. यात एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही संघांमध्ये आठ सामने झाले, जे सर्वच्या सर्व भारताने जिंकलेआहेत. टी-२० विश्वचषकात देखील आठ सामने खेळवण्यात आले असून त्यातील ७ सामने भारताने तर १ सामना पाकिस्तानने जिंकला आहे. टीम इंडियाचे हेच यश आशिया चषकातही दिसून येते.

आशिया चषक : भारत विरुद्ध पाकिस्तान

१९८४ पासून आतापर्यंत खेळल्या गेलेल्या १६ आशिया चषकांमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात १८ सामने झाले आहेत. यापैकी १० सामन्यांमध्ये भारताने, तर ६ सामन्यांमध्ये पाकिस्तानने विजय मिळवला आहे. तर २ सामने निकाल लागला नाही.

IND vs Pak Asia Cup : भारत की पाकिस्तान.. आशिया चषकात कोणाचे पारडे जड? जाणून घ्या आकडेवारी
Kuldeep dropped vs Pakistan : पाकविरुद्धच्या सामन्यातून कुलदीप यादवला ‘डच्चू’ मिळणार? गंभीर गुरुजींवर माजी क्रिकेटपटूचा निशाणा
  • एकदिवसीय : १५ सामने

  • भारत विजयी : ८ सामने

  • पाकिस्तान विजयी : ५ सामने

  • निकाल लागला नाही : २ सामने

  • टी-२० : ८ सामने

  • भारत विजयी : ७ सामने

  • पाकिस्तान : १ सामना

विशेष बाब म्हणजे, दोन्ही संघ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात कधीही आमने-सामने आले नाहीत. त्यांची गाठ प्रामुख्याने गट किंवा सुपर-४ फेरीत पडली आहे.

IND vs Pak Asia Cup : भारत की पाकिस्तान.. आशिया चषकात कोणाचे पारडे जड? जाणून घ्या आकडेवारी
Ind vs Pak match tickets | भारत-पाक सामन्याच्या तिकीट विक्रीत मोठी घट

आशिया चषकातील सर्वात यशस्वी संघ कोणता?

भारत - ८ विजेतेपदे (१९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१०, २०१६, २०१८, २०२३)

श्रीलंका - ६ विजेतेपदे

पाकिस्तान - २ विजेतेपदे

गेल्या पाच वर्षांची स्थिती

सप्टेंबर २०२० पासून ते सप्टेंबर २०२५ पर्यंत, दोन्ही संघांनी टी-२० स्वरूपात ५ वेळा एकमेकांचा सामना केला आहे. यापैकी भारत ३-२ अशा फरकाने पुढे आहे. ही अलीकडील कामगिरी भारताचा आत्मविश्वास वाढवते.

14 तारखेच्या सामन्यासाठी संघ संरचना

भारत (टी-२० संघ) : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), हर्षित राणा, रिंकू सिंग.

पाकिस्तान (टी-२० संघ) : सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अश्रफ, फखर जमान, हसन अली, हसन नवाझ, हुसेन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस (यष्टिरक्षक), मोहम्मद नवाज, शाहीन शाह आफ्रिदी, हॅरिस रौफ, सैफ फरीद, सॅम अयुब, सलमान मिर्झा, सफयान मोकीम.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news