Aryaveer Sehwag viral video : "नेहमी असा विचार करा..." : आर्यवीर सेहवागला विराट कोहलीने दिलेला सल्ल्याचा जुना व्हिडिओ व्हायरल

Aryaveer Sehwag Virat Kohli viral video : लहानग्या आर्यवीरने विचारलेल्या प्रश्नाला विराट कोहलीने दिले होते समर्पक उत्तर
Aryaveer Sehwag Virat Kohli viral video
Aryaveer Sehwag Virat Kohli viral video Pudhari News.
Published on: 
Updated on: 

Aryaveer Sehwag Virat Kohli viral video : क्रिकेट असो की अन्य कोणताही क्रीडा प्रकार, येथे 'घराणेशाही' नसते. उपजत नैसर्गिक गुणांबरोबरच कठोर परिश्रमाची जोड असेल तरच खेळाडू घडतो. त्यामुळेच वडील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू होते म्हणून मुलगाही तशीच कामगिरी करेल, ही चाहत्यांची अपेक्षा फोल ठरते. मात्र, याला काही अपवादही आहेत. आता याच अपवादांमध्ये माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सहवाग याचा मुलगा आर्यवीर सेहवाग याचा समावेश झाला आहे. त्याने नुकताच 'अंडर-१९ आशिया कप २०२६' मध्ये १६० धावांची खेळी करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. क्रिकेट जगतामध्ये आर्यवीरची चर्चा सुरू असतानाच, त्याला भारताचा वनडेतील स्टार फलंदाज विराट कोहलीने दिलेल्या एका सल्ल्याचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आर्यवीर सेहवागची संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध धडाकेबाज फलंदाजी

मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी 'अंडर-१९ आशिया कप २०२६' मध्ये संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्ध खेळताना त्याने ही शानदार खेळी केली. त्याने १७ चौकार आणि सात षटकारांची आतषबाजी करत १६० धावा केल्या. भारतातील उदयोन्मुख फलंदाजांच्या चर्चेत आर्यवीरचे नाव आधीपासूनच होते, परंतु आता त्याच्या या जबरदस्त खेळीमुळे तो सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे.

Aryaveer Sehwag Virat Kohli viral video
Aryveer Sehwag Century : ‘ज्युनिअर सेहवाग’चा धमाका! तुफानी शतकाच्या जोरावर भारताचे UAE समोर ३१० धावांचे आव्हान

विराट कोहलीसोबतचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

'अंडर-१९ आशिया कप २०२६' स्पर्धेदरम्यान आर्यवीर चर्चेत असतानाच, त्याचा आणि विराट कोहलीचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आर्यवीर, विराट कोहलीची मुलाखत घेताना दिसत आहे. यादरम्यान कोहलीने त्याला एक अत्यंत मोलाचा सल्ला दिला.

Aryaveer Sehwag Virat Kohli viral video
Aaryavir Sehwag : आर्यवीर सेहवागचा ‘वीरू’ स्टाईल अर्धशतकी धमाका! ५२ चेंडू कुटल्या ७० धावा, भारताची आशिया चषकात विजयी सलामी

नेहमी असा विचार करा की...

या मुलाखतीवेळी आर्यवीरने विराट कोहलीला प्रश्न विचारला की, वयाच्या १४-१५ व्या वर्षी तुम्हाला आशिष नेहराच्या हस्ते एक पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर, जेव्हा आशिष नेहरा तुमच्या नेतृत्वाखाली क्रिकेट खेळले, तेव्हा तुम्हाला कसे वाटले?आर्यवीरच्या प्रश्नावर उत्तर देताना विराट कोहलीने सांगितले की, "म्हणूनच मी सांगतो: नेहमी असा विचार करा की, 'मी हे करू शकतो'."

Aryaveer Sehwag Virat Kohli viral video
Virat Kohli Breaks Ricky Ponting Record: दुसर्‍या वनडेत 'फ्‍लॉप शो' तरीही विराट कोहलीकडून रिकी पाँटिंगचा विक्रम मोडित!

भारतीय संघ आज अफगाणिस्तान संघाशी भिडणार

'अल अमरात क्रिकेट ग्राउंड' (मिनिस्ट्री टर्फ २) येथे झालेल्या 'अंडर-१९ आशिया कप' सामन्यात, आर्यवीरच्या कामगिरीमुळे भारतीय संघाने संयुक्त अरब अमिरातीचा ७० धावांनी पराभव केला. या विजयामुळे भारत U19 संघाने U19 आशिया चषकाच्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. 'गट अ' (Group A) मध्ये पाकिस्तान U19 संघानंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर राहिला; साखळी टप्प्यात पाकिस्तानने भारतावर मात केली होती. भारताने आपल्या तीनपैकी दोन सामन्यांत विजय मिळवला असून, याआधी त्यांनी नेपाळ U19 संघाचाही पराभव केला होता. आठ वेळा विजेतेपद पटकावलेला भारतीय संघ गुरुवारी होणाऱ्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तान U19 संघाशी भिडणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.