Aryveer Sehwag Century : ‘ज्युनिअर सेहवाग’चा धमाका! तुफानी शतकाच्या जोरावर भारताचे UAE समोर ३१० धावांचे आव्हान

आर्यवीर सेहवागच्‍या १६८ चेंडूंमध्ये १७ चौकार आणि ७ षटकारांसह १६० धावा
Aryveer Sehwag century UAE U19 Asia Cup 2026
'मेन्स अंडर-19 आशिया कप २०२६' मध्‍ये आर्यवीर सेहवागने तुफान दीडशतकी खेळी साकारली. Pudhari News
Published on: 
Updated on: 
Summary

प्रारंभीच्‍या तासात गोलंदाजांना मदत मिळत असलेल्या कठीण खेळपट्टीवर आर्यवीरने सुरुवातीचा दबाव अत्‍यंत संयमाने हाताळला. त्याने ६९ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले.

Aryveer Sehwag century UAE U19 Asia Cup 2026 : ओमानमध्ये 'मेन्स अंडर-19 आशिया कप २०२६' सुरू आहे. आज (दि. १०) भारत आणि UAE आमनेसामने आहेत. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना भारताचा दिग्गज माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवागने तुफानी दीडशतकी (१५० हून अधिक धावा) खेळी साकारली. त्‍याच्‍या दमदारी खेळीमुळे भारताने UAE समोर विजयासाठी ३१० धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे.

'ज्युनिअर सेहवाग'ची धडाकेबाज फलंदाजी

संयुक्त अरब अमिरातीने (UAE) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग उत्कृष्ट लयीत दिसला. त्याने १३१ चेंडूंमध्ये १३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. १६८ चेंडूंमध्ये १७ चौकार आणि ७ षटकारांसह १६० धावा काढून तो बाद झाला. विनीतने ६७ धावांचे योगदान दिले. भारताने निर्धारित ५० षटकांत ३०९ धावांचा भक्कम डोंगर उभारला.

Aryveer Sehwag century UAE U19 Asia Cup 2026
Aaryavir Sehwag : आर्यवीर सेहवागचा ‘वीरू’ स्टाईल अर्धशतकी धमाका! ५२ चेंडू कुटल्या ७० धावा, भारताची आशिया चषकात विजयी सलामी

६९ चेंडूंत पूर्ण केले अर्धशतक

पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघ या स्पर्धेत आपला पहिलाच सामना खेळत होता. प्रारंभीच्‍या तासात गोलंदाजांना मदत मिळत असलेल्या कठीण खेळपट्टीवर आर्यवीरने सुरुवातीचा दबाव अत्‍यंत संयमाने हाताळला. त्याने ६९ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले.

अर्धशतकानंतर फटकेबाजी

खेळपट्टी काहीशी स्थिर झाल्यानंतर आर्यवीरने आपल्या फटकेबाजीला सुरुवात केली. फिरकीपटूसमोर त्‍याची फलंदाजी बहरली. १३१ चेंडूंत त्याने आपले शतक पूर्ण केले. शतक झाल्यावर त्याने UAE च्या गोलंदाजीची पार धूळधाण उडवली. ३८ व्या षटकात डावखुरा मनगटी फिरकीपटू उद्धीश सुरीच्या षटकात त्याने तब्बल २१ धावा केल्‍या. दुसऱ्या टोकाने व्ही. के. विनीतनेही संयमी फलंदाजी करत ६० चेंडूंत अर्धशतक झळकावले आणि भारताचे वर्चस्व वाढवले.

Aryveer Sehwag century UAE U19 Asia Cup 2026
Kapil Dev : "तो विनोद कांबळीसारखा गायब न व्हावा..." : वैभव सूर्यवंशीबाबत माजी क्रिकेटपटू कपिल देव नेमकं काय म्हणाले?

आर्यवीर ठरला स्पर्धेतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करणारा फलंदाज

४२ व्या षटकात लाँग-ऑनच्या वरून उत्तुंग षटकार मारत आर्यवीरने १६० चेंडूंत आपले १५० गुण पूर्ण केले. या खेळीसह तो या स्पर्धेतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारणारा फलंदाज ठरला आहे.डावाच्या ४५ व्या षटकात मध्यमगती गोलंदाज नसीम खानच्या चेंडूवर मिड-विकेटला फटका मारण्याच्या प्रयत्नात आर्यवीर झेलबाद झाला. त्याने १६० धावांच्या या तुफानी खेळीत १७ चौकार आणि ७ षटकार लगावले. तो बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या २५५ होती.

Aryveer Sehwag century UAE U19 Asia Cup 2026
Sunil Gavaskar : "टीम इंडियाने त्‍याचा पर्याय शोधणे...." : हार्दिक पांड्याबाबत सुनील गावस्‍कर नेमकं काय म्‍हणाले?

वडिलांपेक्षा पूर्णपणे वेगळी शैली!

आर्यवीरची फलंदाजीची शैली त्याचे वडील वीरेंद्र सेहवाग यांच्यापेक्षा बरीच वेगळी दिसते. वीरेंद्र सहभाग 'जागीच उभे राहून फटकेबाजी करायचा. तसेच फलंदाजतील अचूक वेळ साधण्‍यास वीरेंद्र सहवाग माहिर होता. मात्र आर्यवीर हा एका पारंपरिक / सलामीवीरासारखा खेळतो. सुरुवातीला गोलंदाजांचा अत्‍यंत संयमाने सर्व अंदाज घेत नंतर त्‍याची फलंदाजी बहरते. विशेषतः फिरकीपटूंविरुद्ध त्‍यांची फलंदाजी अधिक बहरते. फलंदाजीची शैली वेगळी असली तरी मुलाने आपल्‍या वडिलांप्रमाणेच धडाकेबाज आणि प्रभावी फलंदाजी करत 'मेन्स अंडर-19 आशिया कप २०२६' आशिया चषकात स्वतःचा ठसा उमटवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.