Virat Kohli Breaks Ricky Ponting Record: दुसर्‍या वनडेत 'फ्‍लॉप शो' तरीही विराट कोहलीकडून रिकी पाँटिंगचा विक्रम मोडित!

Virat Kohli Breaks Ricky Ponting Record : वनडे मालिकेतील दुसर्‍या सामन्‍यात विराट कोहली केवळ ७ धावांवर बाद झाला.
Virat Kohli Breaks Ricky Ponting Record
विराट कोहली.File Photo
Published on: 
Updated on: 
Summary

वनडेमध्ये रिकी पाँटिंगच्या नावावर असलेला एक महत्त्वाचा विक्रम विराट कोहलीने मोडीत काढला आहे

Virat Kohli Breaks Ricky Ponting Record : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली दुसऱ्या वनडेमध्ये फ्लॉप ठरला. आज (दि. ७) वेलिंग्टन येथे झालेल्या सामन्यात ७ चेंडूंचा सामना करत त्याने ७ धावा केल्या. वेगवान गोलंदाज जेकब डफीने त्याला तंबूत धाडले. मात्र तरीही त्याने इतिहास घडवला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पाँटिंगचा विक्रम मोडीत काढला आहे.

रिकी पाँटिंगच्या नावावर असलेला विक्रम मोडीत

न्यूझीलंडविरुद्धच्या ३८ एकदिवसीय सामन्यांत कोहलीने ५६.५१ च्या सरासरीने १,९७८ धावा केल्या, ज्यामध्ये ७ शतके आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. २०१० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्याने पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. आता न्यूझीलंडविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदला गेला आहे.

Virat Kohli Breaks Ricky Ponting Record
Virat Kohli 55th Century : ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिन कोहली’चे ५५ वे शतक; सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडत ऐतिहासिक झेप

एक धाव घेताच कोहलीने पाँटिंगला टाकले मागे

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि फलंदाज रिकी पाँटिंगने न्यूझीलंडविरुद्ध ५१ एकदिवसीय सामन्यांत ४५.८३ च्या सरासरीने १,९७१ धावा केल्या होत्या. यामध्ये ६ शतके आणि १२ अर्धशतकांचा समावेश होता. वेलिंग्टनमध्ये एक धाव घेताच कोहलीने पाँटिंगला मागे टाकले; त्याआधी ऑकलंडमध्ये ७४ धावांची खेळी करून त्याने पाँटिंगच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दिग्गज सचिन तेंडुलकर तिसऱ्या क्रमांकावर आहेत; त्यांनी ४२ सामन्यांत ४६.०५ च्या सरासरीने १,७५० धावा केल्या आहेत.

Virat Kohli Breaks Ricky Ponting Record
Virat Kohli Test Records: 'किंग' कोहलीचे कसोटी क्रिकेटमधील 'हे' विक्रम माहिती आहेत? जाणून घ्या 'विराट' रेकॉर्डस्‌ एका क्लिकवर

न्यूझीलंडविरुद्ध वनडे सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

  1. विराट कोहली (भारत) धावा १९७८

  2. रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) धावा १९७१

  3. सचिन तेंडुलकर (भारत) धावा १७५०

  4. कुमार संगकारा (श्रीलंका) धावा १५६८

  5. सनथ जयसूर्या (श्रीलंका) धावा १५१९

  6. जॅक कॅलिस (द. आफ्रिका) धावा १४४९

Virat Kohli Breaks Ricky Ponting Record
Virat Kohli Record : ‘किंग कोहली’चा नवा ‘विराट’ पराक्रम! सर्वात वेगवान १५ हजार धावा, सचिन तेंडुलकरचा महाविक्रम मोडीत

दुसऱ्या वनडेत भारताची खराब सुरुवात

वेलिंग्टन येथील एकदिवसीय सामन्यात, १३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार शुभमन गिल पहिल्याच चेंडूवर (गोल्डन डक) बाद झाला; दुसऱ्या षटकातील डफीच्या चेंडूवर हेन्री निकोल्सने त्याचा झेल घेतला. त्यानंतर विराट कोहली फलंदाजीला आला; एक चेंडू निर्धाव खेळल्यानंतर, पुढच्याच चेंडूवर त्याने चौकार मारून रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात शून्यावर बाद झालेला रोहित शर्मा वेलिंग्टनमध्ये २८ चेंडूंत २३ धावा करून बाद झाला. त्याच्या या खेळीत दोन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता; नवव्या षटकात काईल जेमिसनने त्याला बाद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.