पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंगने (harbhanaj singh) नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निवृत्तीची घोषणा होऊन काही दिवसच उलटले असताना त्याने धक्कादाय विधान केले आहे. हरभजनने थेट भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवरच निशाणा साधला आहे. टीम इंडियातून अचानक बाहेर पडण्यामागे महेंद्रसिंग धोनी कारणीभूत असल्याचे त्याने सांगितले आहे. त्याच्या या विधानानंतर क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे.
४१ वर्षीय हरभजन सिंगने (harbhanaj singh) गेल्या आठवड्यात आपल्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला. हरभजन सिंगने १९९८ मध्ये भारताकडून पदार्पण केले. त्याने १०३ कसोटी, २३६ एकदिवसीय आणि २८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. जवळपास दोन दशके टीम इंडियाचा नियमित सदस्य असलेल्या हरभजन सिंगला २०११ मध्ये संघातील स्थान गमवावे लागले. पुढील पाच वर्षे तो कधी संघात असायचा तर कधी बाहेर असायचा. २०११ विश्वचषक स्पर्धेनंतर हरभजन सिंगने १० वनडे आणि १० कसोटी सामने खेळले. २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेत त्याची निवड झाली नव्हती.
एका वृत्त वाहिनीवर मुलाखत देताना त्याने एक गौप्यस्फोट केला. हरभजन सिंग (harbhanaj singh) म्हणाला की, तत्कालीन कर्णधार एमएस धोनीला मला संघातून वगळण्याचे कारण विचारले, परंतु माझ्या प्रश्नाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. जाब विचारण्यात अर्थ नाही हे लक्षात येताच मी पुन्हा कारणे विचारणे बंद केले. खरेतर धोनीकडून जाणून घ्यायचे होते की मला का वगळण्यात आले, पण मला कोणतेही उत्तर शेवटपर्यंत मिळाले नाही, अशी खंत त्याने बोलून दाखवली.
तो पुढे म्हणाला की, कसोटी क्रिकेटमध्ये ४०० बळी घेणारा खेळाडूला अशा प्रकारे बाहेर काढण्यात येते ही एक रहस्यमय कहाणी आहे. धोनीने याचे उत्तर मला अद्याप दिलेले नाही. मला अजूनही आश्चर्य वाटते. प्रत्यक्षात काय घडले? मला संघात असण्यात कोणाला समस्या होती? हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत, असेही त्याने सांगितले.
हरभजन सिंगने (harbhanaj singh) २०११ नंतर अनेक पुनरागमन केले, परंतु तो संघाचा नियमित सदस्य बनला नाही. तो २०१६ मध्ये भारतीय संघाकडून शेवटचा सामना खेळला होता. हरभजन सिंग भारतातील टी २० विश्वचषक स्पर्धेचा सदस्य होता, परंतु तो पॅव्हेलियनमध्ये बसून होता त्याला अंतिम ११ मध्ये स्थान मिळाले नाही. त्यानंतर त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पुढील मालिकेतून वगळण्यात आले आणि त्यानंतर त्याला पुनरागमन करता आले नाही. मात्र, हरभजन सिंग आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत राहिला. IPL 2021 मध्ये, तो इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाइट रायडर्सचा सदस्य होता.
हरभजन सिंग (harbhanaj singh) हा भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू होता. भज्जीने कसोटीत ४१७ आणि एकदिवसीय सामन्यात २६९ विकेट घेतल्या आहेत. तो आयपीएल २०२२ मध्ये बॅकरूम स्टाफमध्ये सामील होऊ शकतो. तो एक अर्धवेळ समालोचक देखील होता आणि पुन्हा एकदा समालोचन करताना दिसेल.