Mann ki Baat मध्ये पंतप्रधान मोदी यांचे 'ओमायक्राॅन'वर महत्वाचे भाष्य! - पुढारी

Mann ki Baat मध्ये पंतप्रधान मोदी यांचे 'ओमायक्राॅन'वर महत्वाचे भाष्य!

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) देशावासियांशी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून २०२१ या वर्षातील शेवटचा संवाद साधला. यामध्ये कोरोनाच्या ओमायक्राॅन या नव्या व्हेरियंटसंदर्भात आणि इतर मुद्द्यांवरही त्यांनी चर्चा केली आहे. (Mann ki Baat)

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “माझ्या प्रेमळ भारतीय नागरिकांनो, नमस्कार! यावेळी २०२१ या वर्षाला निरोप आणि २०२२ या वर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही तयारीला लागला असला. नव्या वर्षांमध्ये प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक संस्था येणाऱ्या वर्षांत काहीतरी नवीन आणि उत्तम करण्याचा संकल्प करतात. मागील ७ वर्षांपासून सातत्याने आपला ‘मन की बात’ हा कार्यक्रम व्यक्ती आणि समाज, देशाला आणखी सुंदर करण्यासाठी प्रेरणा देत आला आहे.” (Mann ki Baat)

“मला आनंद आहे की, आपली बहुरत्न वसुंधरेचं पुण्य कार्य निरंतन सुरू आहे. आज देश ‘अमृतमहोत्सव’ साजरा करत आहे, जी जनशक्ती आहे. शक्तीचा उल्लेख प्रयत्न, कष्ट, भारत आणि मानवतेच्या उज्ज्वल भविष्याची हमी देते. पण, सर्वांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की, कोरोनाचा नवा व्हेरियंटने आपल्या घरापर्यंत आलेला आहे. मागील २ वर्षांचा अनुभव असं सांगतो की, जागतिक पातळीवर महामारीचा पराभव करण्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक प्रयत्न करणे गरजेचे आहे”, असंही मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलं.

“ओमायक्राॅन नावाचा जो कोरोनाचा नवा व्हेरियंट आला आहे, त्याचा अभ्यास शास्त्रज्ञ करतच आहेत. रोज नवनवा डेटा मिळत आहे. त्यांनी सांगितलेल्या सल्ल्यांवर काम होत आहे. अशात वैयक्तिकरित्या जागृत असणे, स्वतः नियम पाळणे, हीच कोरोनाविरुद्ध लढण्यातील सर्वात मोठी शक्ती आहे”, असं मत पंतप्रधानांना मांडले आहे.

पहा व्हिडीओ : दिल्लीची प्रसिद्ध जामा मस्जीद नेमकी आहे कशी? 

Back to top button