James Webb Space Telescope : ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’चे यशस्‍वी प्रक्षेपण | पुढारी

James Webb Space Telescope : ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’चे यशस्‍वी प्रक्षेपण

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

जगातील सर्वात मोठी ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’या अवकाश दुर्बिणीचे आज सायंकाळी अवकाशात प्रक्षेपण झाले. ( James Webb Space Telescope ) अमेरिका, कॅनडा आणि युरोपमधील अवकाश संशोधन संस्‍थांनी संयुक्‍तपणे  फ्रेंचमधील गियाना येथून हे प्रक्षेपण यशस्‍वी केले.

James Webb Space Telescope: निर्मितीस १० अब्‍ज डॉलर्स खर्च

बिग बँगनंतर या आकाशगंगांची निर्मिती कशी झाली? यासंदर्भातील माहिती मिळविण्यासाठी आता जगातील सर्वात मोठी ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’ अंतराळात जाण्यास सज्ज झाली हाेती. ही दुर्बीण अंतराळासंबंधीची असंख्य रहस्ये उलगड्यास मदत करेल, असा विश्‍वास शास्‍त्रज्ञांनी व्‍यक्‍त केला आहे. या टेलिस्कोपच्या निर्मितीस १० अब्‍ज डॉलर्स इतका प्रचंड खर्च करण्‍यात आला आहे. आतापर्यंत अवकाश निरीक्षणात १०० पट शक्‍तीशाली असणारी या या दुर्बिणीच्‍या निर्मितीला २००५मध्‍ये प्रारंभ झाला. मात्र विविध कारणांमुळे निर्मिती रखडली. कॅलिफोर्नियामध्‍ये यशस्‍वी चाचणीही झाली होती. मात्र कोरोना साथीमुळे याचे काम काही महिने बंद होते. मात्र अखेर याचे यशस्‍वी प्रक्षेपण झाले.

‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’चे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट म्हणचे धुळीच्या ढगांमध्ये लपलेल्या तार्‍यानांही ही दुर्बीण पाहण्यास सक्षम आहे. याशिवाय दीर्घ अंतरावरून येणारे वेव्हलेंथलाही डिटेक्ट करण्यासही ती सक्षम आहे. या टेलिस्कोपला हबलचे ‘अपग्रेडेड व्हर्जन’ मानण्यात येत आहे.‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’च्या मदतीने तार्‍यांच्या जीवन चक्राबाबतही समजून घेणे सोपे होणार आहे. या दुर्बिणीच्या मदतीने अंतराळातील आतापर्यंत न पाहिलेले भाग पाहणे आता शक्य होईल, असा विश्‍वास शास्‍त्रज्ञांनी व्‍यक्‍त केला आहे.

 

 

Back to top button