हरभजन सिंगचा क्रिकेटला रामराम!, सोशल मीडियावरून निवृत्तीची घोषणा

हरभजन सिंगचा क्रिकेटला रामराम!, सोशल मीडियावरून निवृत्तीची घोषणा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा अव्वल फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शुक्रवारी त्याने सोशल मीडियावर आपल्या निवृत्तीची घोषणा केली. हरभजन यांनी २३ वर्षांत ७११ बळी टिपले.

त्याने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, सर्वकाही संपत असते. आज मी माझ्या खेळाला रामराम करत आहे. या खेळाने मला सर्वकाही दिले आहे. मी सर्वांचा आभारी आहे, ज्यांनी २३ वर्षांचा प्रवास सुंदर आणि अविस्मरणीय केला.

हरभजन सिंग यांच्या कारकीदींत भारतीय संघाने दोन विश्वचषक जिंकले. २००७ मध्ये टी-२० आणि २०११ मध्ये वन डे वर्ल्ड कप भारतीय संघाने जिंकला.

हरभजन सिंगने यूट्यूबवर व्हिडिओ प्रसिद्ध केला असून जालंधरमधील अरुंद बोळांपासून टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज म्हणून खेळणे हा अतिशय आनंददायी अनुभव होता. मी जेव्हा भारतीय संघाची जर्सी घालून मैदानात उतरलो तेव्हा मला मिळालेल्या प्रेरणेव्यतिरक्त आयुष्यात दुसरे काहीच नव्हते. पण आयुष्यात एक वळण असे येते की तुम्हाला थांबावे लागते. तुम्हाला आयुष्यातील कटू निर्णय घ्यावा लागतो. मी मागील काही वर्षांपासून ही घोषणा करू इच्छित होतो, आणि ती घटना तुमच्याशी शेअर करावी असे वाटत होते.

मी आजपासून क्रिक्रेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घोषित करत आहे. ही प्रतिकात्मकरित्या निवृत्ती आहे, कारण मी मागील बऱ्याच वर्षांपासून खेळू शकलो नाही. प्रत्येक खेळाडूप्रमाणे मी भारतीय संघाची जर्सी घालून निवृत्ती घेण्यास इच्छुक होतो. पण कदाचित नियतीला काही वेगळे मंजूर होते. मी भारतीय संघाकडून खेळलो, त्यासाठी सर्वस्व दिले. माझ्या करिअरमध्ये माझ्या आई वडिलांसह माझ्या बहिणीचा मोठा वाटा आहे.

आयपीएल टीमचा कोच होऊ शकतो हरभजन

माध्यमांत आलेल्या बातम्यांनुसार हरभजन सिंग आयपीएल टीमचा कोच होऊ शकतो. हरभजनने ४१ व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी, गेल्या अनेक वर्षांपासून तो भारतीय संघाकडून खेळलेला नाही. २०१६ मध्ये तो भारतीय संघाकडून शेवटची मॅच खेळला होता. त्यामुळे तो लवकरच निवृत्ती जाहीर करेल असे बोलले जात होते. आता निवृत्तीनंतर तो आयपीएल साठी खेळणाऱ्या कोणत्याही संघाचा कोच होऊ शकतो असे बोलले जात आहे.

कसोटी सामन्यांत ४०० विकेट घेणारा ३ रा भारतीय गोलंदाज

आपल्या कसोटी क्रिकेट करिअरमध्ये ४०० हून अधिक बळी टिपणारा अनिल कुंबळे यांच्यानंतरचा ३ रा गोलंदाज म्हणून हरभजन सिंग याचा उल्लेख केला जातो. हरभजन सिंगने १०३ कसोटी सामन्यांमध्ये ४१७ बळी घेतले आहेत. २३६ वन-डे सामन्यांमध्ये त्याने २६९ बळी घेतले आहेत. आयपीएलमध्ये १६३ सामन्यांत १५० तर २८ टी-२० सामन्यांमध्ये २५ बळी घेतले आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news