नगर : दौंड महामार्गावरील विसापूर शिवारातील अपघातात पती- पत्नी ठार | पुढारी

नगर : दौंड महामार्गावरील विसापूर शिवारातील अपघातात पती- पत्नी ठार

श्रीगोंदा (जि. नगर), पुढारी ऑनलाईन

नगर – दौंड राष्ट्रीय महामार्गावरील विसापूर शिवारात दुचाकी व स्विफ्ट कारच्या अपघातात दुचाकीवरील पती- पत्नी ठार झाले. अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पतीचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. मयत लोणी व्यंकनाथ येथील रहिवासी आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, लोणी व्यंकनाथ येथील शफीक शेख हे पत्नीसोबत दुचाकीवरून नगरच्या दिशेने जात होते. त्यांची दुचाकी विसापूर फाट्याजवळ आली असता, समोरून भरधाव आलेल्या स्विफ्ट गाडीने जोराची धडक दिली.

कारची धडक एवढी जोरदार होती की, शेख यांच्या पत्नी जागीच ठार झाल्या तर शेख हे गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर शेख यांना नगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र उपचारापुर्वी त्यांचीही प्राणज्योत मालवली. अपघाताचे वृत्त समजताच लोणी व्यंकनाथ गावावर शोककळा पसरली.

हेही वाचा

व्हिडिओ पहा : कोल्हापुरात शिवरायांचे 100 × 40 फुटांचे भव्य पोस्टर…

Back to top button