पुढारी ऑनलाईन: लहापणापासून आपण आजी आजोबा किंवा वडीलधाऱ्या लोकांकडून गोष्टी ऐकत आलेलो असतो. तुम्हीही कधीतरी कुणाकडून गोष्ट ऐकण्यातली गंमत अनुभवली असेल. आवाजात केले जाणारे चढ-उतार, रंगवलेली पात्रं, त्या काळाचं केलेलं वर्णन अशी रंगवून सांगितली जाणारी गोष्ट ऐकताना भान हरपतं. आताच्या आधुनिक काळात गोष्टी ऐकवण्याचं स्वरूप बदलेलं आहे. जगात आलेली डिजिटल नावाची क्रांती आपल्या गोष्टींना पुस्तकांच्या बाहेर घेऊन गेली आहे. अशातच पुस्तकं ऐकवण्यासाठी आलेली ऑडिओ बुक्स लोकप्रिय असल्याचं दिसून येतंय. ऑडिओ बुक्सचं हे दालन तरुणांना नेहमी खुणावत असतं. अशाच अनेक ऑडिओ बुक्स चर्चेत आहेत, त्यापैकी एक म्हणजे 'स्टोरीटेल'. सध्याच्या घडीला 'स्टोरीटेल'ने श्रोत्यांच्या मनावर गारुड निर्माण केले आहे.
'स्टोरीटेल'ने आपल्या ग्राहकांसाठी वार्षिक सबस्क्रिप्शनमध्ये खास सवलत जाहीर केली आहे. त्यामुळे ग्राहकांना या सुर्वण संधीचा मोठा फायदा होणार आहे. आता फक्त 399 रुपयांमध्ये 'सिलेक्ट' हा वार्षिक प्लॅन ग्राहक खरेदी करू शकणार आहेत. ही ऑफर 31 डिसेंबर 2021 पर्यंतच उपलब्ध असणार आहे. पूर्वी असणाऱ्या 1198 रुपयांच्या प्लॅनची किंमत कमी कमी करून ती थेट 399 एवढी केली आहे. स्टोरीटेल हे 399 च्या वार्षिक वर्गणीमध्ये 10 पेक्षा अधिक प्रादेशिक भाषांमधील ऑडिओ बुक्स आणि ई-बुक्ससाठी अनलिमिटेड ऍक्सेस देत आहे. स्टोरीटेल मुख्य उद्दिष्ट हे मार्केटमध्ये उतरून ग्राहकांच्या गरजा समजून घेणे आहे.
399 रुपये किमतीत वर्षभर सबस्क्रिप्शन मिळत असल्याने स्टोरीटेलवर पुस्तकांची कॅटेगिरी वाढण्यास मदत होणार आहे. सध्या स्टोरीटेल अॅपवर 2 लाखांपेक्षा जास्त पुस्तके आहेत. त्यामध्ये प्रत्येक आठवड्याला अनेक पुस्तकांचा समावेश होऊन ती ग्राहकांसाठी उपलब्ध असतात. या नवीन प्लॅनद्वारे स्टोरीटेलचा प्रेक्षक वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
याबद्दल बोलताना स्टोरीटेलचे इंडिया कंट्री मॅनेजर योगेश दशरथ म्हणाले की, "ऑडिओबुक्सला बाजारात चांगली पसंती मिळत आहे आणि ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जात आहेत. ऑडिओबुक्स वापरून पाहण्याची उत्सुकता लोकांमध्ये आहे. 11 प्रादेशिक भाषांमधील स्टोरीटेलवर उपलब्ध असणाऱ्या गोष्टींवर अनलिमिटेड ऍक्सेससोबत वार्षिक सदस्यता ऑफर देत आहोत. ग्राहकांचा कथांचा व पुस्तकांचा शोध पॉकेट-फ्रेंडली बनवणे हा यामागील एक हेतू आहे . ग्राहकांच्या मनोरंजनासाठी आम्ही नेहमी नवीन गोष्टी आणण्यासाठी तयार असतो.
परवडणाऱ्या किमती वाचण्यासाठी ग्राहकांना उत्साहित करतील. स्टोरीटेलचे उद्दिष्ट आहे की कथा प्रत्येकासाठी उपलब्ध व्हावी, तीही 399 रुपये प्रति वर्ष एवढ्या कमी किमतीत. स्टोरीटेलचे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा आणि आपले सदस्यत्व आजच कन्फर्म करा.
https://www.storytel.com/in/en/c/annual
तसेच स्टोरीटेल अॅप Google Play Store http://bit.ly/2rriZaU आणि iOS अॅप स्टोअर https://apple.co/2zUcGkG या दोन्हींवर उपलब्ध आहे.
स्टोरीटेल ही ऑडिओबुक आणि ईबुक अॅप्ससाठी 27 नोव्हेंबर 2017 रोजी भारतात लॉन्च केलेली स्ट्रीमिंग सेवा आहे. स्टॉकहोम, स्वीडन येथे मुख्यालय असलेल्या या कंपनीचे सध्या जगभरात 25 देशांमध्ये ही सेवा उपलब्ध आहे. भारतात, हे अॅपम १२ प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी, उर्दू, बंगाली, तमिळ, मल्याळम, तेलगू, आसामी, ओडिया, गुजराती आणि कन्नड भाषांचा समावेश आहे. स्टोरीटेलवर दोन लक्षांपेक्षा ऑडिओबुक आणि ईबुक आहेत . प्रत्येकजण कधीही, कुठेही शेअर करू शकेल आणि आनंद घेऊ शकेल अशा उत्तम कथा ग्राहकांना उपलब्ध करुन देण्याचा आमचा मानस आहे.