

मुंबई, पुढारी ऑनलाईन : शिवसेना नेते रामदास कदम यांना विधानभवन च्या गेटवर सुरक्षा व्यवस्थेने अडविल्याने चर्चेला ऊत आला. कदम यांनी मागील आठवड्यात परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप करून खळबळ उडवून दिली होती. आज ते विधीमंडळात गेले असता त्यांनी आरटीपीसीआर चाचणी केली नसल्याने त्यांना अडविण्यात आले.
अखेर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना निर्देश दिल्यानंतर त्यांना आत सोडण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. केवळ आरटीपीसीआर चाचणी करणाऱ्यांनाच विधिमंडळात प्रवेश देण्यात येत आहे. गर्दी टाळण्यासाठी स्वीय सहाय्यकांना विधिमंडळाबाहेर उभारण्यात आलेल्या शेडमध्ये बसण्याची व्यवस्था केली आहे. रामदास कदम आज विधीमंडळात आले असता त्यांनी आरटीपीसीआर चाचणी केली नसल्याने त्यांना पोलिसांनी गेटवरच अडवले. त्यानंतर कदम फोनवर बोलत तिथेच थांबले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना कदम यांची अँटिजेन चाचणी करून आत सोडण्याची सूचना केली. त्यानुसार प्रवेश देण्यात आला.
रामदास कदम यांनी शिवसेनेच्या नेत्यांवरच आरोप केल्याने त्यांना गेटवर अडविले का? असाही प्रश्न उपस्थित झाला. परंतु RTPCR चाचणीशिवाय कुणालाही विधान भवनात प्रवेश घेता येत नाही. बाहेरील सर्व व्यक्तींना हा नियम लागू असल्याने त्यांनाही तोच नियम लागू करण्यात आला असे सांगण्यात आले.
रामदास कदम विधानभवन : परब-कदम यांच्यात खडाजंगी
मंडणगड, दापोली नगरपंचायत निवडणुकांच्या ऐन रणधुमाळीत शिवसेना नेते रामदास कदम यांना जबर धक्का बसला होता. त्यांच्या मर्जीतील पदाधिकार्यांची उचलबांगडी करून त्या जागी नवीन नियुक्त्या करण्यात आल्या. विशेष म्हणजे त्यांचे शिवसेनेतीलच कट्टर विरोधक माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या समर्थकांची वर्णी या नव्या नियुक्त्यांमध्ये लावण्यात आली आहे. पालकमंत्री अॅड. अनिल परब यांच्यासंदर्भातील कथित ऑडिओ क्लिप प्रकरण रामदास कदम यांना भोवले असून माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या साह्याने अॅड. परब यांनी विरोधात मोर्चा उघडून कदम यांचे पंख छाटण्यास सुरुवात केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
हेही वाचा :