IND vs SA Test : विराट कोहली द. आफ्रिकेत स्वतःचा विक्रम मोडणार का? | पुढारी

IND vs SA Test : विराट कोहली द. आफ्रिकेत स्वतःचा विक्रम मोडणार का?

पुढारी ऑनलाईन डेस्क :  टीम इंडिया 26 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका ( IND vs SA Test ) खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघाची जबाबदारी कर्णधार विराट कोहलीवर असेल. विराटला दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. तेथील परिस्थितीची त्याला चांगली जाण आहे. या दौऱ्यात विराटला इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी असून, तो स्वतःचा विक्रम मोडणार का, याकडे चाहत्यांची नजर लागली आहे.

विराटने जानेवारी 2018 मध्ये सेंच्युरियन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 153 धावांची शानदार खेळी खेळली होती. विराट 379 मिनिटे क्रीजवर राहिला. मात्र, शानदार दीड शतकी खेळीनंतर तो झेलबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.

खरंतर टीम इंडिया 2018 साली दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी ३ कसोटी, ६ एकदिवसीय आणि ३ टी-20 सामन्यांची मालिका असं शेड्युल होतं. या दौऱ्याच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 13 जानेवारी 2018 पासून सेंच्युरियन येथे सुरू झाला. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमान संघाने पहिल्या डावात सर्वबाद 335 धावा केल्या. यानंतर भारतीय संघ पहिला डाव खेळण्यासाठी मैदानात उतरला. भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर लोकेश राहुल अवघ्या 10 धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार विराट कोहली फलंदाजीला आला.

विराट क्रीजवर पोहोचला. द. आफ्रिकेचे वेगवान गाेलंदाज कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी आणि मोर्ने मॉर्केल यांच्या सामना करू लागला.  या डावात तो सुमारे 379 मिनिटे खेळला. यादरम्यान त्याने 217 चेंडूंचा सामना केला आणि 15 चौकारांच्या मदतीने 153 धावा केल्या. यानंतर  झेलबाद झाला आणि बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.  दुसऱ्या डावात अवघ्या 5 धावा करून विराट बाद झाला. त्याच्यासह इतर खेळाडूंनाही दुसऱ्या डावात फारसे काही करता आले नाही आणि भारताने हा सामना 135 धावांनी गमावला हाेता. टीम इंडियाने जानेवारी 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका 2-1 ने गमावली हाेती. यावेळी टीम इंडियाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करू शकतो. यावेळी

IND vs SA Test :   द. आफ्रिका दाैर्‍यात विराटला संधी

भारत 26 डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळणार आहे. त्याचवेळी, दुसरा आणि तिसरा कसोटी सामना अनुक्रमे 3 जानेवारी आणि 11 जानेवारीपासून जोहान्सबर्ग आणि केपटाऊनमध्ये खेळवला जाईल. या दौऱ्यात शतकी विक्रमाची पुनरावृत्ती करण्याची विराट कोहलीला चांगली संधी आहे. त्यामुळे विराटच्या शतकी खेळीचा दोन वर्षांपासूनचा दुष्काळ संपणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button