महिन्याचे शिल्लक धान्य जाते कुठे?

Where the remaining grain of the month goes
Where the remaining grain of the month goes
Published on: 
Updated on: 

प्रत्येक दुकानात शिल्लक राहते शेकडो किलो धान्य

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात विविध स्वस्त धान्य दुकानांत महिनाभरात जवळपास साडेचारशे ते पाचशे क्विंटल धान्य पुरवले जाते. मात्र, त्यापैकी प्रत्येक दुकानात हमखास 1 ते 2 क्विंटल शिल्लक राहते.

ते धान्य पुरवठा अधिकार्‍यांना दाखवणे आवश्यक असताना, अनेकदा त्याची परस्पर विक्री होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तर, शिधाधारकांच्या कुटुंबातील एकातरी व्यक्तीचे 'थम्ब इम्पे्रशन' घेतल्याशिवाय हे धान्य देत नसल्याने असे विकता येत नसल्याचे दुकानदारांनी स्पष्ट केले.

शहरातील अन्न सुरक्षा अंतर्गत कुटुंबाला प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य वाटप करण्यात येते. दरम्यान, दर महिन्याला त्या-त्या दुकानादारांचा कोटा ठरल्यानुसार त्याचे धान्य पुरविण्यात येते. महिन्याच्या अखेरीस शहरातील दुकानांत काही साठा शिल्लक राहतो.

हा साठा शिधापात्रिकाधारक वेळेवर नेत नसल्यास अथवा एका महिन्यात तो आला नसल्याने हे धान्य विकले जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

दरम्यान, पुणे विभागांतर्गत जवळपास 724 रेशन धान्याची दुकाने आहेत. तर, 10 लाखापर्यंत एकूण शिधापत्रिका धारक संख्या आहे. गेल्या वर्षी देहूरोड येथे एका दुकानचालकाने 135 किलो धान्याची अफरातफर केली होती.

तसेच, वेळेवर धान्य न मिळणे, दुकानचालकांची अरेरावी, प्रति व्यक्ती तांदुळाच्या वाटपात घोळ अशा तक्रारी अधिकार्‍यांपर्यंत येतात.

अन्नपुरवठा अधिकार्‍यांनी तपासणी करण्याची मागणी

धान्य दुकानचालकांना प्रत्यक्ष भेटून सूचना देण्यात येतात. अशा तक्रारी प्राप्त झाल्यास आम्ही त्यावर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे. प्रत्येक तक्रारीचे बारकाईने निरसन केले जाते.
– दिनेश तावरे, अन्नपुरवठा अधिकारी

…तर कुटुंबाच्या दुसर्‍या सदस्याचे थम्ब घेतो

धान्य वाटप थम्ब इम्प्रेशनशिवाय देता येत नाही. अनेकदा ज्येष्ठाचे थम्ब उमटत नाहीत अथवा काही तांत्रिक कारण निर्माण होते. मात्र, आम्ही अडवणूक न करता त्यांना धान्य देतो. त्यानंतर घरी जाऊन कुटुंबातील अन्य सदस्यांचा अंगठा घेऊन त्याची नोंद करतो.

ते धान्य भरावेच लागते

रेशन धान्य दुकानचालक धान्य विकण्याची शक्यता कमीच असल्याचे एका दुकानचालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. आज जरी त्याने धान्य विकले तरी त्याच्या हिशेब त्यांना देणे आहेच.

त्यामुळे तो कधी ना कधी पकडला जाऊ शकतो. त्यामुळे धान्य चोरणे, विकणे असे प्रकार होत नाहीत. राहिलेले धान्य वजा करून पुढील महिन्यात धान्य दिले जात

https://youtu.be/6Od5mMZ4sb8

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news