Joe Root : जो रुटने सचिन तेंडूलकर, सुनिल गावस्कर यांचा ‘हा’ विक्रम मोडला | पुढारी

Joe Root : जो रुटने सचिन तेंडूलकर, सुनिल गावस्कर यांचा ‘हा’ विक्रम मोडला

ॲडलेड; पुढारी ऑनलाईन : इंग्लंडचा कर्णधार जो रूटने (Joe Root) भारताच्या दोन माजी फलंदाजांचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जो रूटने आता सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांना मागे टाकले आहे. त्याने या कॅलेंडर वर्षात 1600 हून अधिक कसोटी धावा केल्या आहेत. यापूर्वी 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथनेही एका कॅलेंडर वर्षात 1600 हून अधिक कसोटी धावा केल्या होत्या.

Image

अॅडलेडमध्ये खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या अॅशेस कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जो रूटने (Joe Root) डेव्हिड मलानसोबत तिसऱ्या विकेटसाठी 128 धावांची भागीदारी केली. रूटने यापूर्वी मायकेल वॉनचा विक्रम मोडला होता आणि एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करणारा तो इंग्लिश कर्णधार बनला होता.

Image

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानचा माजी फलंदाज मोहम्मद युसूफच्या नावावर आहे, त्याने 2006 मध्ये 11 कसोटी सामन्यांमध्ये 99.33 च्या सरासरीने 1788 धावा केल्या होत्या. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज फलंदाज विव्ह रिचर्ड्स आहेत. त्यांनी 1976 मध्ये 11 कसोटी सामन्यांमध्ये 90 च्या सरासरीने 1710 धावा केल्या होत्या. भारताचे सुनील गावस्कर 1555 धावांसह सातव्या तर सचिन तेंडुलकर 1562 धावांसह सहाव्या स्थानावर आहेत. (Joe Root)

अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ 236 धावांवर ऑलआऊट झाला. ऑस्ट्रेलियाला 237 धावांची आघाडी मिळाली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली. मिचेल स्टार्कने 4 विकेट घेतल्या. तर नॅथन लियॉनच्या खात्यात 3 विकेट्स आल्या. पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या मायकेल नेसरला एक तर बळी अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला दोन मिळण्यात यश आले.

Image

अधिक वाचा :

Back to top button