Ashes Series : ICC च्या नियमांची पायमल्ली, बेन स्टोक्सच्या १४ ‘नो बॉल’कडे पंचांचा कानाडोळा!

Ashes Series : ICC च्या नियमांची पायमल्ली, बेन स्टोक्सच्या १४ ‘नो बॉल’कडे पंचांचा कानाडोळा!
Ashes Series : ICC च्या नियमांची पायमल्ली, बेन स्टोक्सच्या १४ ‘नो बॉल’कडे पंचांचा कानाडोळा!
Published on
Updated on

ब्रिसबेन, पुढारी ऑनलाईन : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील ॲशेस कसोटी मालिकेतील (Ashes Series) सामने भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याप्रमाणेच पाहिले जातात. ॲशेस मालिकेतील प्रत्येक सामन्यात वर्चस्व राखण्यासाठी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ झगडताना दिसतात. या मालिकेदरम्यान अनेक विक्रम, इतिहास रचले जातात. त्याचबरोबर खेळाडू-खेळाडूंमधील वाद, खेळाडू-पंचांमधील तिव्र मतभेद, तर पंचांचे वादग्रस्त निर्णय यामुळेही ही मालिका गाजते.

सध्या ॲशेज मालिकेचे (Ashes Series) यजमानपद ऑस्ट्रेलियाकडे आहे. सध्या ब्रिसबेनच्या गाबा मैदानात मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. आज (दि. ९) सामन्याचा दुसरा दिवस होता. हा दिवस मैदानी पंचाच्या वादग्रस्त पंचगीरीमुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहिला आहे. दुस-या दिवसाच्या खेळात पंच आयसीसीच्या नियमांची पायमल्ली करताना दिसले. या प्रकारानंतर नेटक-यांनी आयसीसीवर जोरदार टीका केली.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील मेगा ॲशेस मालिकेतील (Ashes Series) पहिला सामना (AUS vs ENG) ब्रिस्बेन येथील 'गाबा' मैदानावर खेळला जात आहे. बेन स्टोक्सने टाकलेल्या पहिल्या ३० चेंडूतील १४ नो-बॉल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात मैदानी पंचांनीही दुर्लक्ष करत फक्त दोनदा नो बॉलचा निर्णय दिला. महत्त्वाचे म्हणजे स्टोक्सच्या नो-बॉलमुळेच ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची मौल्यवान विकेट इंग्लंडला मिळवता आली नाही. मात्र, यामुळे अॅशेस मालिकेतील तांत्रिक समस्याही समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि सध्या समालोचकाच्या भूमिकेत असाणा-या रिकी पाँटिंगने खराब अंपायरिंगवर जोरदार टीका केली आहे.

ॲशेस मालिकेतील सामने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी बनवलेल्या नियमांचे पालन करून खेळवले जात आहेत. इंग्लंडचा गोलंदाज बेन स्टोक्सने त्याच्या पहिल्या पाच षटकांमध्ये १४ नो-बॉल टाकले. ज्याला मैदानी पंच किंवा टीव्ही अंपायर यांनी 'नो-बॉल' म्हटलेच नाही. बेन स्टोक्स त्याच्या स्पेलचे पहिले षटक टाकत होता. त्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर वॉर्नर (David Warner) बाद झाला, पण टीव्ही रिप्लेमध्ये स्टोक्सचा पाय गोलंदाजी क्रीजच्या बाहेर असल्याचे दिसून आले. पंचांनी तो नो बॉल असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर चॅनल-7 ने बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर नजर ठेवली. तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. स्टोक्सने नो-बॉल टाकत होता पण मैदानी पंच त्याकडे कानाडोळा करत होते.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नियमांनुसार प्रत्येक चेंडूवर गोलंदाजाचा पाय क्रीजच्या बाहेर जातो की नाही हे तपासण्याची जबाबदारी तिसऱ्या पंचाची आहे. पण तसे झालेले नव्हते कारण तिसर्‍या पंचांनाच तांत्रिक सुविधाही पुरवण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती समजली. हा सामना जुन्या नियमांनुसार खेळवला जात आहे, ज्यामध्ये फक्त विकेट घेणा-या चेंडूनंतरची तपासणी केली जाते. चॅनल 7 ने बेन स्टोक्सची पाचही षटके तपासली आणि त्याचा पाय १४ वेळा गोलंदाजी क्रिजच्या बाहेर गेल्याचे आढळले.

आयसीसीने २०१९ मध्ये नियम बनवले..

२०१९ मध्ये पहिल्यांदाच ICC ने ट्रायलच्या स्वरूपात टीव्ही अंपायरला नो-बॉल तपासण्याचा अधिकार दिला होता. २०२० मध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या मालिकेत त्याची नियमितपणे अंमलबजावणी करण्यात आली. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१-२३ च्या नियमांमध्ये हे स्पष्ट आहे की थर्ड अंपायरला प्रत्येक चेंडू तपासावा लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news