Rachin Ravindra: न्‍यूझीलंडला तारणारा रचिन रवींद्र ठरला चर्चेतील चेहरा | पुढारी

Rachin Ravindra: न्‍यूझीलंडला तारणारा रचिन रवींद्र ठरला चर्चेतील चेहरा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

भारत -न्‍यूझीलंडमध्‍ये कानपूरच्‍या ग्रीन पार्क मैदानावर पहिली कसोटी रंगली. अखेरच्‍या चेंडूपर्यंत रंगलेला हा सामना अखेर अनिर्णीत राहिला. न्‍यूझीलंडचा अष्‍टपैलू खेळाडू रचिन रवींद्र ( Rachin Ravindra)  याने झुंझार फलंदाजी केली. कानपूर कसोटीतील दुसर्‍या डावात न्‍यूझीलंडच्‍या रचिनने ९१ चेंडू खेळून काढले. त्‍याने १८ धावा केल्‍या. भारतीय वंशाचा रचिन याच्‍या खेळीने न्‍यूझीलंडला तारले. तर भारताच्‍या विजयाचा घास हिरावरा हा खेळाडू चर्चेत आला आहे.

राहुलमधील Ra आणि सचिनमधील Chin वरुन मुलाचं नाव ठेवलं रचिन

रचिन रवींद्र त्‍याचे वडील रवि कृष्‍णमूर्ती हे एक सॉप्‍टवेअर इंजिनियर. ते कर्नाटकमधील बेंगळूरचे. ते ९०च्‍या दशकात नोकरी निमित्त न्‍यूझीलंडला गेले. कृष्‍णमूर्ती यांना क्रिकेटचे भारी वेड. भारतीय क्रिकेट संघातील सचिन तेंडूलकर आणि राहुल द्रविड यांचे ते चाहते होते. वेलिंग्‍टनमध्‍ये १८ नोव्‍हेंबर १९९९ रोजी त्‍यांना मुलगा झाला. आपल्‍या मुलाचे नाव सचिन तेंडूलकर आणि राहुल द्रविड यांच्‍या नावावरुनच ठेवायचे असे त्‍यांनी ठरवलं. यातूनच त्‍यांनी राहुलमधील Ra आणि सचिनमधील Chin या दोन शब्‍दांना एक करत आपल्‍या मुलाचे नाव रचिन ( Rachin ) असे ठेवले.

वडिलांमुळेच रचिन यालाही क्रिकेटची आवड निर्माण झाली. पालकांनीही त्‍याला प्रोत्‍साहन दिलं. त्‍यानेही उत्‍कृष्‍ट खेळीचे प्रदर्शन करत २०१८ मध्‍ये न्‍यूझीलंडच्‍या अंडर 19 संघात आपले स्‍थान निर्माण केलं. याच वर्षी सप्‍टेंबर महिन्‍यात त्‍याने बांगलादेशविरोधातील सामन्‍यात टी-20 संघात स्‍थान मिळवलं. आता योगायोग असा की, भारताचे दोन्‍ही महान क्रिकेटपटू राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर या दोन्‍ही नावाच्‍या संगम एकत्र आल्‍यावर काय होईल? याचीच प्रचिती रचिन रवींद्रने ( Rachin Ravindra) आपल्‍या खेळातून देत आहे. अवघ्‍या २२ व्‍या वर्षी तो क्रिकेट जगतामधील चर्चेचा चेहरा झाला आहे.

 

हेही वाचलं का?

 

Back to top button