virat and anushka : 'तू घरात असतोच कधी'... अनुष्‍का शर्माने उडवली विराटची खिल्‍ली | पुढारी

virat and anushka : 'तू घरात असतोच कधी'... अनुष्‍का शर्माने उडवली विराटची खिल्‍ली

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्‍याची पत्‍नी, अभिनेत्री अनुष्‍का शर्मा (virat and anushka )  हे दोघेही नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असतात. ते आपले फोटो फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. हे फोटो त्‍यांच्‍या
चाहत्‍यांसाठी पर्वणीच ठरतात. दोघांच्‍या फोटोवर चाहते मजेशीर कमेंटही करतात.

virat and anushka : “तू माझ्‍याबरोबर असतेच तेव्‍हा प्रत्‍येक ठिकाण हे मला घरासारखंच असतं”

नुकताच विराट कोहलीने सोशल मीडियावर अनुष्‍काबरोबरचा एक रोमॉटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्‍ये विराट आणि अनुष्‍का हे एका नदी किनारी निवांत बसल्‍याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करताना विराटनं म्‍हटलं की, “तु माझ्‍याबरोबर असतेच तेव्‍हा प्रत्‍येक ठिकाण हे मला घरासारखंच असतं”. मात्र विराटच्‍या या रोमॉटिक फोटोची अुनष्‍काने खिल्‍ली उडवली आहे.

फाेटाेला तब्‍बल ४१ लाखांहून अधिक लाईक्‍स

विराटने फोटो आणि कॅप्‍शन शेअर करताच अनुष्‍काने त्‍यावर तत्‍काळ प्रतिक्रिया दिली. “फोटो तर छान आहे कारण तु घरात असतोच कधी”?, असा प्रश्‍न तिने विराटला केला आहे. विराटनेही ‘हा हा हा’ असे मसेज करत तिला दाद दिला. विराट कोहली आणि अनुष्‍का शर्मा यांच्‍या या फाेटाे आणि पोस्‍टला तब्‍बल ४१ लाखांहून अधिक लाईक्‍स मिळाल्‍या आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

 

हेही वाचलं का?

 

Back to top button