R. Ashwin 5 Wickets Haul : एकमेवव्दितीय..! अश्‍विन ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज | पुढारी

R. Ashwin 5 Wickets Haul : एकमेवव्दितीय..! अश्‍विन 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

पुढारी ऑनलाईन डेस्क : R Ashwin 5 Wickets Haul : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवा कसोटी सामना धर्मशाला येथे खेळला जात आहे. सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात 218 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करून भारताने सामन्यात एकूण 477 धावा करून इंग्लंडवर 259 धावांची आघाडी घेतली. रोहित आणि शुभमन यांनी शतकी खेळी केली. तर यशस्वी, सर्फराज आणि देवदत्त यांनी अर्धशतकी खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडच्‍या संघाला फिरकीपटू अश्विनने आपल्या फिरकीच्या जाळ्यात फसवून त्यांने आपल्या नावावर एका नव्‍या विक्रमाची नोंद केली आहे. (R. Ashwin 5 Wickets Haul)

पाच फलंदाजांना बाद करण्याची किमया 36 वेळी साधली

या सामन्यात भारताने पहिल्या डावात 477 धावा करून इंग्लंडविरूद्ध 259 धावंची आघाडी घेतली. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाला दुसऱ्या डावाच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये बेन डकेटला बाद करून पहिला धक्का दिला. यानंतर त्याने अनुक्रमे झॅक क्रॉली, ओली पोप, बेन स्टोक्स आणि बेन फोक्स यांना बाद करून आपल्या 100 कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत 36 वेळी पाच फलंदाजांना बाद करण्याची किमया साधली आहे.

अश्विनची दमदार कामगिरी (R Ashwin 5 Wickets Haul)

रविचंद्रन अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 4 तर दुसऱ्या डावात 5 बळी घेतले. कसोटी क्रिकेट करियरमध्ये अश्विनने एका डावात 36 व्यांदा 5 बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. कसोटी सामन्यात पाच विकेट घेण्याच्या बाबतीत त्याने भारताचा माजी गोलंदाज अनिल कुंबळेला पिछाडीवर टाकले आहे. इंग्लंडविरूद्धच्या कसोटी सामन्याही पाच विकेट घेवून त्याने कुंबळेंच्या विक्रमाशी बरोबरी केली होती.अनिल कुंबळे यांनी कसोटीत 35 वेळा 5 बळी घेण्याची किमया केली आहे.

कसोटीच्या एका डावात सर्वाधिक वेळा 5 बळी घेणारे गोलंदाज

  • मुथय्या मुरलीधरन : 67 वेळा (133 कसोटी)
  • शेन वॉर्न : 37 वेळा (145)
  • रिचर्ड हॅडली : 36 वेळा (86)
  • रविचंद्रन अश्विन : 36 वेळा (100)
  • अनिल कुंबळे : 35 वेळा
  • रंगना हेरथ : 34 वेळा (132)

‘हे’ तीनच गोलंदाज पुढे (R Ashwin 5 Wickets Haul)

कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिकवेळा 5 बळी घेण्याच्या बाबतीत आता फक्त तीन गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या पुढे आहेत. यामध्ये मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न आणि रिचर्ड हॅडली यांचा समावेश आहे. मुरलीधरनने कसोटी क्रिकेटमध्ये 67 वेळा एका डावात 5 विकेट्स घेतल्या आहेत.

अश्विनची कसोटी कारकीर्द

आर. अश्विनची गणना भारताच्या सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांमध्ये केली जाते. त्याने भारतीय संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकून दिले आहेत. जेव्हा तो लयीत असतो तेव्हा तो फलंदाजीचा कोणताही हल्ला उद्ध्वस्त करू शकतो. त्याने भारताकडून 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले असून आतापर्यंत 100 कसोटी सामन्यांमध्ये 516 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर एक फलंदाज म्हणून त्याच्या खात्यात 3309 धावाही जमा आहेत.

हेही वाचा :

Back to top button