गुंजवणी धरणग्रस्तांचा प्रश्न तातडीने मार्गी लावा : आमदार संग्राम थोपटे | पुढारी

गुंजवणी धरणग्रस्तांचा प्रश्न तातडीने मार्गी लावा : आमदार संग्राम थोपटे

भोर : पुढारी वृत्तसेवा : गुंजवणी प्रकल्पाचा वाटप आराखडा निश्चित करावा, तसेच हिर्डोशी येथील 35 खातेदारांची वाटप प्रक्रिया त्वरित करावी, यांसह अनेक मागण्यांवर धरणग्रस्तांबाबतच्या आढावा बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी दिली. पुणे येथील विधानभवनात निरा देवघर, गुंजवणी प्रकल्पांबाबत विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांच्यासमवेत बैठक घेऊन धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत थोपटे यांनी सकारात्मक चर्चा केली. यामध्ये भोर-वेल्हा तालुक्यांतील हिर्डोशी येथील 35 खातेदारांची वाटप प्रक्रिया प्रलंबित असून, ती जलद करावी, धामुणशी येथील ज्ञानोबा धामुणसे व मधुकर मालुसरे यांची घरे पाडून झालेली नुकसानभरपाई मिळणे, निरा देवघर प्रकल्पग्रस्तांना ज्या जमिनी वाटप केल्या आहेत, परंतु त्यांची पावती करून दिली नाही, याबाबत कामनिहाय कॅम्प करून पावती द्यावी.

14 डिसेंबर 2021 शासन निर्णय रद्द करण्याबाबत शासनाला अहवाल करण्यात यावा, जमीन वाटप करताना सर्व्हे कर करून जमीन वाटणी अहवाल मागवला जातो. तथापि, एकच सर्व्हे कर असल्यामुळे ते 6-6 महिने तारीख देत नाहीत. पूर्वीप्रमाणे तहसीलदार यांच्याकडून अहवाल मागवून वाटप करावे, निरा देवघर धरण लाभ क्षेत्रातील जमिनी इतर प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात येऊ नयेत, गुंजवणी प्रकल्पाचा वाटप आराखडा निश्चित करावा, यांसह अनेक बाबींवर या आढावा बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली, असे थोपटे यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button