आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या मतदारसंघातील कुळधरण (ता-कर्जत) येथील नव्याने सुरु झालेल्या बिर्याणी हाऊस'ला सदिच्छा भेट दिली हाेती. यावेळी कार्यकर्त्यांसोबत तेथील जेवणाचा आस्वाद घेतला. याची पाेस्ट त्यांनी ८ मार्च, महाशिवरात्री दिनी केली. मात्र त्यांनी बिर्याणी हाऊस'ला सदिच्छा भेट केव्हा दिला याचा उल्लेख त्यांच्या पाेस्टमध्ये नाही. मात्र या पाेस्टमुळे ते प्रचंड ट्राेल झाले. तसेच याच दिवशी शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांच्या बारामती Agro या कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. कारवाई नंतर रोहीत पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, "माझ्या कंपनीवर ED ने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का? पण भाजपाने लक्षात ठेवावं, झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू! माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत! या कारवाईवरुन आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतच लागेल, हेही दिसतंय.