Hamza Saleem Dar : अवघ्या ४३ चेंडूंत १९३ धावांचा पाऊस; हमजा सलीम दारचा पराक्रम

Hamza Saleem Dar : अवघ्या ४३ चेंडूंत १९३ धावांचा पाऊस; हमजा सलीम दारचा पराक्रम
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : युरोपियन टी-१० क्रिकेट मालिकेतील ४५ व्या सामन्यात मंगळवारी सोहल हॉस्पिटलटेट आणि कॅटालोनिया जग्वार आमने-सामने होते. या सामन्यात कॅटालोनिया जग्वारचा सलामीवीर हमजा सलीम दार (Hamza Saleem Dar)ने अवघ्या ४३ चेंडूंत नाबाद १९३ धावांची खेळी करत विक्रमांची रांग लावली. त्याने अवघ्या २४ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. त्याचे द्विशतक अवघ्या ७ धावांनी हुकले नाही, तर क्रिकेट इतिहासात टी- १० क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला असता. कॅटालोनिया जग्वार संघाने हा सामना १५७ धावांनी जिंकला. सलीमच्या १९३ धावाशिवाय यासीर अलीने ५८ धावांचे योगदान दिले. यासीरने १९ चेंडूंत नाबाद ५८ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून तीन चौकार आणि सात षटकार आले. त्याचा स्ट्राईक रेट ३०५.२६ होता.

संबंधित बातम्या : 

एका षटकात कुटल्या ४३ धावा

सलीमने आपल्या ऐतिहासिक खेळीत १४ चौकार आणि २२ षटकार मारले. त्याने ४४८.८३ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आणि अवघ्या २४ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. या खेळीदरम्यान त्याने एका षटकात सहा षटकार मारण्याचा पराक्रमही केला. कॅटालोनियाच्या डावातील नववे षटक टाकण्यासाठी आलेल्या महंमद वारिसच्या षटकात एकूण ४३ धावा आल्या. सलीमने या षटकात सलग सहा षटकार ठोकले. नऊ चेंडूंच्या या षटकात दोन वाईड आणि एक नो बॉलचाही समावेश होता. सलीमने या षटकात चौकार मारला आणि त्यानंतर त्याने सलग सहा षटकार ठोकले. (Hamza Saleem Dar)

कॅटालोनिया संघाने एकही गमावली नाही विकेट

प्रथम फलंदाजी करताना कॅटालोनिया संघाने निर्धारित १० षटकांत एकही विकेट न गमावता २५७ धावा केल्या. सलीमने १९३ धावांची नाबाद खेळी, तर यासीरने ५८ धावांची नाबाद खेळी खेळली. दोन षटकांत ४४ धावा देणारा शहजाद खान सोहल संघाचा सर्वात कमी धावा देणारा गोलंदाज ठरला. संघाच्या एकाही खेळाडूला विकेट मिळाली नाही. २५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सोहल हॉस्पिटलटेटचा संघ आठ गडी गमावून केवळ १०४ धावाच करू शकला. त्यामुळे त्यांनी १५३ धावांनी सामना गमावला. रझा शहजादने सर्वाधिक २५ धावा केल्या.

दारची गोलंदाजीतही शानदार कामगिरी

कॅटालोनियासाठी हमजा सलीम दारने गोलंदाजीतही चांगली कामगिरी करत तीन विकेटस् घेतल्या. त्याच्याशिवाय फैजल सरफराज, फारूख सोहेल, अमीर हमजा आणि कर्णधार उमर वकास यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. सलीमने दोन षटकांत १५ धावा देत तीन बळी घेतले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news