Gambhir vs Sreesanth | गौतम गंभीरवरील टीकेमुळे श्रीसंत अडचणीत, LLC ने बजावली नोटीस

Gambhir vs Sreesanth | गौतम गंभीरवरील टीकेमुळे श्रीसंत अडचणीत, LLC ने बजावली नोटीस
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये (LLC) गौतम गंभीर सोबत झालेल्या वादानंतर भारताचा माजी वेगवान गोलंदाज श्रीसंत चांगलाच संतापला. गुरुवारी (दि.7) त्यांने सोशल मीडियावर व्हिडिओ आणि पोस्टद्वारे आपला राग व्यक्त केला. यादरम्यान त्याने सांगितले की, सामन्यादरम्यान गंभीरने मला 'फिक्सर' म्हटले होते. इंडिया टुडेच्या बातमीनुसार या प्रकरणाबाबत व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे त्याला एलएलसी कमिशनरने कायदेशीर नोटीस पाठवली आहे. (Gambhir vs Sreesanth)

श्रीसंतला पाठवलेल्या नोटीसमध्ये स्पर्धेदरम्यान खेळाडूंच्या कराराचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे. श्रीसंत त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेले व्हिडिओ काढून टाकेल तेव्हाच त्याच्याशी चर्चा केली जाईल, असेही नमूद करण्यात आले आहे.
या वादाचा पंचांनीही अहवाल पाठवला आहे, मात्र त्यांना 'फिक्सर' म्हणवल्याच्या श्रीसंतच्या दाव्याबाबत काहीही बोलले गेले नाही.

सामन्यात नक्की काय घडलं

लिजेंड्स क्रिकेट लीग क्रिकेट 2023 मध्‍ये इंडिया कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात श्रीसंतच्या चेंडूवर गंभीरने चौकार मारले. तेव्हा श्रीसंतने गंभीर याच्‍याकडे रागाने पाहिले. त्यावरून दोघांमध्ये शब्दांची देवाणघेवाण झाली. दोघेही खेळाडूंनी एकमेकांना खुन्‍नस देत जवळ आले. मात्र, सहकारी खेळाडूंनी मध्यस्थी करून दोघांना वेगळे केल्‍याने पुढील अनर्थ टळला. या सामन्यानंतर श्रीसंतने गौतमवर गंभीर आरोप केले तर. गंभीरने सोशल मीडियावर पोस्ट केली . त्यांनी या पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतले नसून, हे श्रीशांतला दिलेले प्रत्युत्तर मानले जात आहे.

गंभीरने गुरुवारी सकाळी 11:30 वाजता X (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट टाकली, ज्यामध्ये तो टीम इंडियाच्या जर्सीत आहे आणि हसत आहे. गंभीर भारतीय संघात खेळत असतानाचे हे चित्र आहे. त्याने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले- स्माईल! जेव्हा जगातील लोक फक्त लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतात.

श्रीसंतने दिले गंभीरला प्रत्‍युत्तर

इंडिया कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात झालेल्‍या सामन्‍यात गौतम गंभीरने दमदार फलंदाजीचे प्रदर्शन घडवले. त्‍याने ७ चौकार आणि १ षटकार पटकावला. कॅपिटल्सने 20 षटकांत सात गडी गमावून 223 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 211 धावाच करू शकला. सामना संपल्यानंतर, जेव्हा कॅपिटल्सने जायंट्सला पराभूत करून क्वालिफायर 2 मध्ये स्थान निश्चित केले, तेव्हा श्रीसंतने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये त्याने गौतम गंभीर यांच्‍यावर आरोप केले.

Gambhir vs Sreesanth : मिस्‍टर फायटर विनाकारण सर्वांशी भांडतो…

पोस्‍ट केलेल्‍या व्हिडिओमध्ये श्रीसंत याने म्‍हटलं आहे की, मिस्टर फायटरसोबत काय घडले याबद्दल मला काही स्पष्ट करायचे होते. मिस्टर फायटर विनाकारण त्याच्या सर्व सहकाऱ्यांशी भांडतो. तो त्याच्या वरिष्ठ खेळाडूंचा आणि वीरूभाई (वीरेंद्र सेहवाग)सह अनेक लोकांचाही आदर करत नाही. नेमकं तेच झालं. कोणतीही चिथावणी न देता तो माझ्याशी काहीतरी बोलत राहिला. त्‍याचे वागणे अत्यंत असभ्य होते. .

Gambhir vs Sreesanth : 'गंभीरने मला आणि माझ्या कुटुंबाला दुखावलं'

या सामन्यादरम्यान गंभीरने त्याला काय सांगितले होते ते मी उघड करणार असल्याचे श्रीशांतने सांगितले. गौतम गंभीर याने वापरलेल्‍या शब्दांमुळे माझे आणि माझ्‍या कुटुंबीयांचे मन दुखावले. 'ही माझी चूक नाही. त्याने वापरलेले शब्द आणि क्रिकेटच्या मैदानावर त्याने सांगितलेल्या गोष्टी मान्य नाहीत हे उशिरा का होईना, तुमच्या लक्षात येईल. मी माझ्या कुटुंबासह खूप सहन काही केले आहे. तुमच्या पाठिंब्याने मी एकट्याने ही लढाई लढली आहे. आता काही लोकांना विनाकारण माझा अपमान करायचा आहे. त्याने त्या गोष्टी सांगितल्या ज्या त्याला सांगायला नको होत्या," असे श्रीसंत याने व्‍हिडिओमध्‍ये म्‍हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by SREE SANTH (@sreesanthnair36)

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news