Mitchell Marsh : वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवण्याच्या कृतीचे मार्शकडून समर्थन | पुढारी

Mitchell Marsh : वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवण्याच्या कृतीचे मार्शकडून समर्थन

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियाने वन-डे विश्वचषक 2023 मध्ये अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून विजय मिळवला. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ सेलिब्रेशन करत असताना ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू मिशेल मार्शने वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवल्याचा फोटो व्हायरल झाला होता. वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवण्याच्या मुद्द्यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ऑस्ट्रेलियाच्या ‘सेन रेडिओ नेटवर्क’शी बोलताना त्याने या वादावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या या उत्तरानंतर तो पुन्हा वादात सापडू शकतो. या वादाला त्याने सडेतोड उत्तर देऊन नवा वाद निर्माण केला आहे. (Mitchell Marsh)

एका मुलाखतीत मार्शला फोटोबद्दल विचारण्यात आले होते. त्या कृतीत ट्रॉफीचा अनादर झाला नसल्याचे त्याने सांगितले. मार्श पुढे म्हणाला की, जर त्यांनी पुन्हा विश्वचषक जिंकला, तर तो पुन्हा तसेच करेल. तू पुन्हा तेच करशील का, असे विचारले असता, तो म्हणाला, होय, मला नक्कीच आशा आहे, मी असेच करेन; कारण त्यात अपमानास्पद काहीही नव्हते. मी त्याचा फारसा विचार केला नाही. मी फारसे सोशल मीडियाकडे पाहिलेही नाही. त्यात तसे काही नव्हते. (Mitchell Marsh)

बहुसंख्य भारतीय चाहत्यांनी मार्शला त्याच्या अनादरपूर्ण कृत्याबद्दल फटकारले, तर काहींनी त्याचा बचाव केला की, ते भारतीय संस्कृतीच्या द़ृष्टिकोनातून चुकीचे वाटू शकते; परंतु ऑस्ट्रेलियन लोकांसाठी, ट्रॉफीवर पाय ठेवणे हे त्यांचे वर्चस्व दर्शविणारी कृती आहे.

हेही वाचा :

Back to top button