India vs Australia T20 series : पुन्‍हा संघाबाहेर! ‘या’ इमोजीने चहलला काय सांगायचं आहे?

India vs Australia T20 series :  पुन्‍हा संघाबाहेर! ‘या’ इमोजीने चहलला काय सांगायचं आहे?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषकानंतर आता लगेच भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी २० मालिकेसाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी लेगस्पिनर युजवेंद्र चहलची निवड झालेली नाही. चहलच्या आधी युवा लेगस्पिनर रवी बिश्नोईला संधी देण्यात आली आहे. घरच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या टी-२० मालिकेसाठी संधी न मिळाल्याने चहलने यावर प्रतिक्रिया दिली आहे. (India vs Australia T20 series)

संबंधित बातम्या : 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २३ नोव्हेंबरपासून पाच सामन्यांची T20I मालिका सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे. सोमवारी रात्री झालेल्या संघ निवडीत रवी बिश्नोई, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना फिरकीपटू म्हणून संधी मिळाली. युझवेंद्र चहलचे नाव या संघात नाही. (India vs Australia T20 series)

इमोजीद्वारे चहलला काय सांगायचं आहे?

चहलने संघात निवड झाली नसल्याने यावर प्रतिक्रिया देताना स्माईल इमोजी शेअर केली आहे. या इमोजीद्वारे त्याला सांगायचे आहे की, काहीही झाले तरी तो भविष्यात संघात स्थान मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करेल. संघात त्याची अचानक निवड न होणे हे देखील दर्शवते की २०२४ च्या T20 विश्वचषकासाठी त्याचा विचार केला जाणार नाही. या वर्षी ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यामध्ये खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत युझवेंद्र चहल खेळला होता.

चहलची निवड न झाल्याने काही चाहते नाराजही आहेत. चहलच्या या पोस्टला रिट्विट करत एका चाहत्याने लिहिले आहे की, त्याने राजस्थान रॉयल्स संघ सोडावा, कारण त्याच्याशिवाय संजू सॅमसन आणि रायन पराग यांनाही त्या संघातून संधी मिळालेली नाही. आणखी एका चाहत्याने लिहिले की, "हे अवास्तव आहे. भारतासाठी सर्वाधिक T20I विकेट घेणारा खेळाडू T20I मालिकेसाठी निवडला जात नाही.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news