IND VS AUS Final World Cup 2023 | नरेंद्र मोदी स्टेडियमवर ‘सूर्यकिरण’ एअर शोचा थरार, पाहा व्हिडिओ | पुढारी

IND VS AUS Final World Cup 2023 | नरेंद्र मोदी स्टेडियमवर 'सूर्यकिरण' एअर शोचा थरार, पाहा व्हिडिओ

पुढारी ऑनलाईन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज रविवारी (दि. १९ नॉव्हेंबर) विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम महासंग्राम होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा हायव्होल्टेज ड्रामा होत आहे. अंतिम सामन्यात ऑस्‍ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या अंतिम सामन्यापूर्वी एका खास एअर शोने सर्वांचे लक्ष वेधले. अंतिम सामन्याचा थरार सुरू होण्यापूर्वी भारतीय वायुसेनेच्या ‘सूर्य किरण एरोबटिक टीम’ने (Surya Kiran aerobatic team) ‘एअर शो’ सादर केला. या चित्तथरारक हवाई चित्तथरारक कवायतीचा थरार प्रेक्षकांनी अनुभवला. (IND VS AUS Final World Cup 2023)

Image

संबंधित बातम्या 

भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण प्रोबेटिक टीममध्ये सामान्यतः ९ विमानांचा समावेश असतो. त्यांनी देशभरात असे अनेक एअर शो केले आहेत.

संरक्षण विभागाचे गुजरात जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) यांनी याधी म्हटले होते की सर्यकिरण एरोबटिक संघ मोटेरा परिसरातील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्याच्या पहिल्या दहा मिनिटांसाठी आपल्या स्टंटने लोकांना रोमांचित करेल.

टीम इंडिया १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना खेळत आहे. २०११ मध्ये समोर श्रीलंकेचा संघ होता, यावेळी ऑस्ट्रेलिया आहे. पण एकच स्वप्न आहे… ती सुंदर चमकणारी ट्रॉफी जिंकण्याचे.

Image

अंतिम सामन्यापूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर क्रिकेट चाहत्यांनी मोठी गर्दी केली. टीम इंडियाचे समर्थक आणि सचिन तेंडुलकरचे चाहते सुधीर कुमार चौधरी म्हणतात, “टीम इंडिया २०११ च्या विजयाची पुनरावृत्ती करेल. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शतके झळकावीत आणि ऑस्ट्रेलियाला ४५० धावांचे लक्ष्य द्यावे आणि सहज जिंकावे अशी माझी इच्छा आहे…” (IND VS AUS Final World Cup 2023)

हे ही वाचा :

Back to top button