IND vs AUS Final : ऑस्‍ट्रेलियाच्‍या ‘या’ पाच खेळाडूंचे भारतासमाेर असेल माेठे आव्‍हान

IND vs AUS Final : ऑस्‍ट्रेलियाच्‍या ‘या’ पाच खेळाडूंचे भारतासमाेर असेल माेठे आव्‍हान
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात आज रविवारी (दि.१९) भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होत आहे. हा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. दोन्ही संघांनी विश्वविजेतेपदासाठी पूर्ण तयारी केली आहे. टीम इंडिया जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि या स्पर्धेत आपले सर्व 10 सामने जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने खराब सुरुवातीनंतर दमदार पुनरागमन करत अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघांच्या कामगिरीत मोठा फरक असा आहे की, भारतीय संघाने आपले बहुतांश सामने एकतर्फी जिंकले आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने अनेक सामन्यांमध्ये संघर्ष केल्यानंतर विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने मॅक्सवेलच्या स्‍मंरणीय खेळीच्या जोरावर अफगाणिस्तान विरुद्ध विजय मिळवला हाेता. (IND vs AUS Final )

ऑस्ट्रेलियान संघात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. हे खेळाडू अंतिम फेरीत चमकदार कामगिरी दाखवून ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत नेऊ शकतात आणि भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंग करू शकतात. या पाच खेळाडूची टीम इंडियाला काळजी घ्यावी लागेल.

डेव्हिड वॉर्नरला लवकर बाद करणे आवश्यक

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या खांद्यावर असेल. तो अनुभवी फलंदाज असून परिस्थितीनुसार खेळण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्याने स्पर्धेत चांगली सुरुवात केली होती. या विश्वचषकात त्याने दोन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत. बंगळुरूमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या साखळी सामन्यात त्याने १६३ धावांची दमदार इनिंग खेळली होती. त्यानंतर त्याच्या पुढच्या सामन्यात त्याने दिल्लीत नेदरलँड्सविरुद्ध १०४ धावा केल्या. (IND vs AUS Final )

सामने: 10, धावा: 528, सर्वोत्तम: 163

मिचेल मार्शपासून सावध

हा उजव्या हाताचा आक्रमक फलंदाज जेव्हा आपल्या लयीत असतो तेव्हा त्याला रोखणे सोपे नसते. तो टिकला की तो दीर्घ आणि आक्रमक खेळी खेळतो. त्याच्याबाबत भारतीय संघाला सावध राहावे लागेल लागणार आहे. त्याचवेळी गोलंदाजांना अचूक रणनीती आखून त्याला झटपट पॅव्हेलियनमध्ये पाठवावे लागेल.त्याने दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे. या विश्वचषकात त्याने पाकिस्तानविरुद्ध बंगळुरूमध्ये पहिले शतक झळकावले. त्याने 121 धावांची इनिंग खेळली होती. यानंतर त्याने पुण्यात बांगलादेशविरुद्ध १७७ धावांची नाबाद खेळी खेळली. तो दोनदा खाते न उघडताच बाद झाला. वेगवान गोलंदाजीतही तो हात आजमावतो. त्याने पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या होत्या.

सामने: 10, धावा: 457, सर्वोच्च: 177*, विकेट्स: 04

मॅक्सवेलसाठी रचावा लागणार सापळा

मॅक्‍सवेल हा ऑस्‍ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू संघ अडचणीत असताना महत्त्‍वपूर्ण योगदान देतो. मात्र, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा ही भारतीय फिरकी जोडी त्याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवू शकते. यावेळी विश्वचषकात त्याने नाबाद द्विशतक, एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले आहे. त्याने अफगाणिस्तानविरुद्ध 201 धावांची नाबाद खेळी खेळून आपल्या संघाला उपांत्य फेरीत पोहोचवले. त्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती आणि तरीही त्याने गोलंदाजांवर हल्ला करणे सुरूच ठेवले. याशिवाय त्याने नेदरलँडविरुद्ध १०६ धावांची खेळी खेळली होती. मात्र, भारताच्या भक्कम गोलंदाजीसमोर त्यांचीही कसोटी लागणार आहे.

सामने: 08, धावा: 398, सर्वाधिक: 201*, विकेट्स: 06

जोश हेझलवूडच्‍या भेदक मार्‍याचा सक्षम सामना करण्‍याचे आव्‍हान

भारतीय कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत स्पर्धेच्या सुरुवातीच्या पॉवरप्लेमध्ये विरोधी गोलंदाजांची लय खराब केली आहे. यावेळी अंतिम फेरीतही त्याला आपली आक्रमक शैली कायम ठेवायची आहे. अशा स्थितीत त्याने हेझलवूडवर आक्रमण केल्यास त्याची लय बिघडेल आणि त्याचा फायदा इतर फलंदाजांना होईल. या विश्वचषकात त्याने आपली सर्वोत्तम कामगिरी (३/३८) फक्त भारताविरुद्धच केली. याशिवाय त्याने चार वेळा प्रत्येकी दोन विकेट घेतल्या आहेत.

सामने: 10, विकेट्स: 14, सर्वोत्तम: 3/38

ॲडम झंम्पाची फिरकीसमोर संयमी खेळी महत्वाची

भारतीय फलंदाज फिरकी खेळण्यात पटाईत आहेत; पण अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी संथ आणि फिरकीपटूंना उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत झंप्मा धोकादायक ठरू शकतो आणि भारताला त्याच्यावर तोडगा काढावा लागेल. भारताविरुद्धच्या साखळी सामन्यात आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याला विकेट घेता आलेली नाही. मात्र हे दोन सामने सोडले तर सर्व सामन्यांमध्ये त्याने विकेट्स घेतल्या आहेत. त्याने प्रत्येकी तीन वेळा चार विकेट घेतल्या आहेत. नेदरलँड्सविरुद्ध त्याने आठ धावांत चार बळी घेतले हाेते.

सामने: 10, विकेट्स: 22, सर्वोत्तम: 4/8

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news