IND vs AUS Prediction : वर्ल्ड कप काेण जिंकणार?, ज्योतिषी सुमित बजाज म्‍हणाले… | पुढारी

IND vs AUS Prediction : वर्ल्ड कप काेण जिंकणार?, ज्योतिषी सुमित बजाज म्‍हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्‍वचषक स्‍पर्धेच्‍या अंतिम सामन्‍याला काही तासांचा अवधी उरला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रविवार, १९ नोव्‍हेंबर २०२३ रोजी अंतिम सामन्‍यात ( World Cup Final ) भारताचा मुकाबला ऑस्‍ट्रेलियाची होणार आहे. त्यापूर्वी देशभरातील क्रिकेट चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. देशभरात टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना, होमहवन केले जात आहे. या हाय व्होल्टेज मॅचपूर्वी ज्योतिषी सुमित बजाज यांनी विजेत्याबाबत त्यांचे भाकीत केले आहे.

ज्योतिषी बजाज यांनी व्‍यक्‍त केलेल्‍या अंदाजानुसार, २०२३ च्या विश्वचषकातील अंतिम सामन्‍यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा पराभव करेल. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी हा सर्वात कठीण सामना असेल, मात्र अंतिम सामन्‍यात ऑस्‍ट्रेलियाचा कर्णधार कमिन्‍स याचे निर्णय चुकतील. भारत हा सामना जिंकेल, असे भाकीत ज्योतिषी  सुमित बजाज यांनी केले आहे. (IND vs AUS Prediction) विशेष म्हणजे, संपूर्ण विश्वचषकादरम्यान, ज्योतिषी बजाज यांनी टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीसह अनेक सामन्यांच्या निकालांचा अचूक अंदाज वर्तवला आहे.

हेही वाचा :

Back to top button