ICC WC Semi Final : पाकिस्तान वर्ल्ड कपमधून आऊट, उपांत्य फेरीचा पहिला सामना मुंबईत भारत-न्यूझीलंडमध्‍ये रंगणार

ICC WC Semi Final : पाकिस्तान वर्ल्ड कपमधून आऊट, उपांत्य फेरीचा पहिला सामना मुंबईत भारत-न्यूझीलंडमध्‍ये रंगणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचा संघ एकदिवसीय विश्वचषकातून बाहेर पडला असल्‍याचे आज औपचारिक जाहीर झाले. पाकिस्‍तानसाठीची अशक्‍यप्राय असणारी 'जर-तर'ची परिस्थिती cho (11 नोव्हेंबर) संपली. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानी 50 षटकांत नऊ बाद 337 धावा केल्या. पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी हा सामना 6.2 षटकांत (38 चेंडू) जिंकावा लागणार होता. पाकिस्तानचा संघ ही कामगिरी करू शकला नाही. यामुळे ते स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. (ICC WC Semi Final)

उपांत्य फेरीसाठी चार संघ निश्चित

पाकिस्तानच्या बाहेर पडल्याने उपांत्य फेरीसाठी चार संघ निश्चित झाले आहेत. गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असलेल्या भारताशिवाय दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलियाबरोबरच आता पाकिस्तानच्या बाहेर पडल्याने न्यूझीलंडचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. बंगळुरूमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर न्‍यूझीलंड संघाने उपांत्‍य फेरीत एक पाय ठेवला होता. आता पाकिस्तानचा पराभव झाल्याने किवी संघाचे स्थान निश्चित झाले आहे.

पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा विश्वचषकात उपांत्य फेरीत स्थान मिळवता आले नाही. भारतात 2011 साली झालेल्या विश्वचषकात उपांत्य फेरीमध्ये स्थान मिळवले होते. यानंतर 2015 मध्ये पाकिस्तान उपांत्यपूर्व फेरीत बाहेर पडला होता. 2019 आणि 2023 मध्ये, ते ग्रुप स्टेजमध्येच स्पर्धेतील त्यांचा प्रवास थांबला होता. (ICC WC Semi Final)

भारत आणि न्यूझीलंडमध्‍ये सलग दुसर्‍या विश्‍वचषक स्‍पर्धेत उपांत्य फेरीचा सामना

सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कपमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. गेल्या वेळी २०१९ मध्‍ये टीम इंडियाला न्‍यूझीलंड विरुद्‍ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. विराट कोहलीच्‍या नेतृत्त्‍वाखाली झालेला हा सामना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्‍या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतील अखेरचा सामना ठरला होता. धोनी 2020 मध्ये निवृत्त झाला. तो पराभव टीम इंडिया आजवर विसरली नाही. यावेळी मुंबईत किवी संघ पुन्‍हा एकदा टीम इंडियासमोर असणार आहे. तसेच दुसरा उपांत्य फेरीतील सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्‍ट्रेलिया यांच्‍यात होणार आहे. हा सामना १६ नोव्‍हेंबर रोजी कोलकाता येतील ईडन गार्डन मैदानात होणार आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news