Uddhav Thackeray: मुंब्रा येथे उद्धव ठाकरेंचा ताफा पोलिसांनी अडवला | पुढारी

Uddhav Thackeray: मुंब्रा येथे उद्धव ठाकरेंचा ताफा पोलिसांनी अडवला

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : कायदा -सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ठाणे पोलिसांनी उद्धव ठाकरे यांचा ताफा वादग्रस्त शाखेपासून काही अंतरावर अडवला आहे. यावेळी शिवसेनेच्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते आणि मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आमने-सामने आले आहेत. त्यामुळे सध्या येथे मोठा तणाव निर्माण झाला आहे. Uddhav Thackeray

ठाणे पोलीस सहआयुक्त दत्तात्रय कराळे यांच्यासह तीन पोलीस उपायुक्त घटनास्थळी उद्धव ठाकरे यांच्याशी गेली पंचवीस मिनिटे चर्चा करीत आहेत. आम्ही कुठल्याही परिस्थितीत शाखेजवळ जाऊन पाहणी करू, या मागणीवर उद्धव ठाकरे ठाम आहेत. तर याचवेळी दुसरीकडे उपस्थित असलेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवल्याने ठाकरे यांच्यासोबत उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे नेते संतप्त झाले. तुम्ही आधी त्या गटाच्या लोकांना आवरा, नाहीतर जबाबदारी आमची नाही, अशी भूमिका या नेत्यांनी बोलून दाखवली. पोलीस फक्त आम्हाला रोखण्यासाठी आले आहेत का ? असा सवाल देखील यावेळी ठाकरे यांनी चर्चा करण्यास आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना विचारला. Uddhav Thackeray

हेही वाचा 

Back to top button