Asian Para Games 2023 | पॅरा गेम्समध्ये रमण शर्माची नव्या आशियाई विक्रमासह सुवर्णधाव | पुढारी

Asian Para Games 2023 | पॅरा गेम्समध्ये रमण शर्माची नव्या आशियाई विक्रमासह सुवर्णधाव

पुढारी ऑनलाईन : आशियाई पॅरा गेम्समध्ये पुरुषांच्या १५०० मीटर- T38 धावण्याच्या स्पर्धेत भारताच्या रमण शर्मा याने सुवर्ण कामगिरी केली. रमण शर्माने अंतिम फेरीत ४:२०.८० मिनिटांच्या वेळेसह नवा आशियाई विक्रम नोंदवत सुवर्ण जिंकले.

तर तिरंदाजीत महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंडमध्ये शीतल देवीने आणखी एक सुवर्ण जिंकले. तिने अंतिम फेरीत सिंगापूरच्या अलीम नूर स्याहिदा हिला १४४-१४२ अशा गुणांनी हरवले. शीतल देवीचे हे आशियाई पॅरा गेम्समधील तिसरे पदक आहे.

तसेच प्रमोद भगत हा नवा पॅरा आशियाई गेम्स चॅम्पियन बनला आहे. त्याने अंतिम फेरीत नितेश कुमार याला पराभूत करून बॅडमिंटनमध्ये पुरुषांच्या SL3 प्रकारात सुवर्णपदक जिंकले. नितेश कुमारला रौप्यपदक मिळाले.

बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीच्या SH6 प्रकारात कृष्णा नगर याने रौप्यपदकाची कमाई केली. कृष्णा नगरने पॅरा बॅडमिंटन पुरुष एकेरी – SH6 प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत हाँगकाँगच्या काई मान चू विरुद्धच्या लढतीत रौप्यपदक मिळवले.

प्रदीप कुमारने पुरुषांच्या भालाफेक F-54 स्पर्धेत २५.९४ मीटरच्या थ्रोसह भारताला रौप्यपदक मिळवून दिले. तर अभिषेक चमोलीने २५.०४ मीटर मीटरच्या थ्रोसह कांस्यपदक मिळवले. दरम्यान, पॅरा ॲथलीट लक्ष्मीने महिलांच्या डिस्कस थ्रो-F37/38 मध्ये २२.५५ मीटर थ्रो करुन कांस्यपदक मिळवले.

Back to top button