Asian Para Games 2023 | पॅरा गेम्समध्ये सिद्धार्थ बाबूने इतिहास रचला, ५० मीटर रायफलमध्ये विक्रमासह जिंकले सुवर्ण | पुढारी

Asian Para Games 2023 | पॅरा गेम्समध्ये सिद्धार्थ बाबूने इतिहास रचला, ५० मीटर रायफलमध्ये विक्रमासह जिंकले सुवर्ण

पुढारी ऑनलाईन : आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय नेमबाज सिद्धार्थ बाबू याने इतिहास रचला आहे. सिद्धार्थ बाबूने R6 मिश्र ५० मीटर रायफल्स प्रोन SH-1 प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरीत २४७.७ गुणांसह नवीन विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. यासह नेमबाज सिद्धार्थ बाबूने पॅरिस २०२४ पॅरा ऑलिम्पिकसाठी कोटा देखील मिळवला आहे.

संबंधित बातम्या 

दरम्यान, आज सचिन सर्जेराव खिलारी याने पुरुषांच्या F-46 शॉट पुटमध्ये भारतासाठी विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. तर महिलांच्या शॉट पुट F34 मध्ये भाग्यश्री जाधव हिने ७.५४ मीटर थ्रोसह अविश्वसनीय कामगिरी करत रौप्यपदक मिळवले. तर तिरंदाज आदिल मोहम्मद नझीर अन्सारी आणि नवीन दलाल यांनी तिरंदाजीच्या पुरुष दुहेरी – W1 खुल्या स्पर्धेत १२५-१२० गुणांसह कांस्यपदक मिळवले.

पॅरा गेम्समध्ये भारताने आतापर्यंत ७३ पदके मिळवली आहेत. यात १७ सुवर्णदकांचा समावेश आहे. भारताची ही आशियाई पॅरा गेम्समधील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. पॅरा गेम्समध्ये भारताची मागील सर्वोत्तम कामगिरी २०१८ मध्ये झाली होती, जेव्हा देशाला १५ सुवर्णपदके मिळाली होती.

हे ही वाचा :

Back to top button