Asian Para Games 2023 : बॅडमिंटनमध्ये वैष्णवी आणि मानसीला कांस्य | पुढारी

Asian Para Games 2023 : बॅडमिंटनमध्ये वैष्णवी आणि मानसीला कांस्य

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशियाई पॅरा गेम्स २०२३ मध्ये वैष्णवी पुणेयानी आणि मानसी जोशी यांची बॅडमिंटन स्पर्धेतील वाटचाल कांस्यपदकासह संपुष्टात आली. त्यांना महिला एकेरीच्या SL3 स्पर्धेत उपांत्य फेरी गाठता आली नाही. मानसी इंडोनेशियाच्या स्याकुरोह कोनिताहकडून १०-२१,१४-२१ ने पराभूत झाली.

संबंधित बातम्या : 

शीतल देवी आणि सरिता अधना यांना आशियाई पॅरा गेम्स २०२३ मध्ये महिला दुहेरी कंपाउंड सांघिक तिरंदाजी स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अखेरच्या सुवर्ण सामन्यात चीनच्या लिन/झांग यांच्याकडून १५०-१५२ असा पराभव झाला. आशियाई पॅरा गेम्समध्ये पूजाने महिलांच्या F54/F55 डिस्कस थ्रो इव्हेंटमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. या स्पर्धेत टेबल टेनिस वर्ग १ पुरुष एकेरीमध्ये संदीप डांगीने ४ पैकी २ सामने जिंकून कांस्यपदक मिळवले. तर भारताच्या हॅनीने पुरुषांच्या भालाफेक F37 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याने ५५.९७ मीटर थ्रो फेकून सुवर्णपदकावर नाव कोरले.

आशियाई पॅरा गेम्समध्‍ये भारताने बॅडमिंटन मिश्र दुहेरी SL3-SU5 मध्ये आणखी एक पदक पटकावले आहे. नितेश कुमार आणि तुलसीमाथी मुरुगेसन यांनी कांस्यपदक जिंकले आहे. भारताच्या श्रेयांश त्रिवेदीने पुरुषांच्या २०० मीटर टी -३७ धावण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक पटकावले. २५.२६ सेकंदात त्याने ही कामगिरी केली. पुरुषांच्या २०० मीटर टी ३५ धावण्याच्या स्पर्धेत नारायण ठाकुरने २९.८३ सेकंद नोंदवत भारतासाठी कांस्यपदक जिंकले. याच स्पर्धेत रवी कुमार ३१.२८ सेकंदांसह पाचव्या स्थानावर राहिला.

आशियाई पॅरा गेम्समध्‍ये तिसऱ्या दिवशी भारताने टेबल टेनिसमध्येही खाते उघडले. टेबल टेनिस महिला एकेरी – वर्ग ४ क्रीडा प्रकारात कांस्यपदक मिळवले. भालाफेकमध्ये भारताच्या सुमित अंतिलने इतिहास रचला. पुरुषांच्या भालाफेक F64 स्पर्धेत सुमितने ७३.२९ मीटर भाला फेकून सुवर्णपदक पटकावले, तर पुष्पेंद्र सिंगने ६२.०६ मीटरच्या थ्रोसह कांस्यपदकावर नाव कोरले.

हेही वाचा : 

Back to top button