National Games 2023 : तेलंगणाचा थरुण मन्नेपल्ली बॅडमिंटन पुरुष एकेरीत विजेता

National Games 2023
National Games 2023

पणजी, पुढारी वृत्तसेवा : तेलंगणाचा थरुण मन्नेपल्ली ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन पुरुष एकेरीत विजेता ठरला. त्याने अतिशय चुरशीच्या लढतीत माजी विजेत्या मध्यप्रदेशच्या सौरभ वर्मा याला एक तास व दहा मिनिटांच्या खेळात १५-२१, २१-१६, १५-२१ असे नमविले. (National Games 2023)

ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये पुरुष एकेरीत अंतिम लढत आज (दि.२४) झाली. स्पर्धेत चौथे मानांकन असलेल्या २२ वर्षीय थरुण याने सौरभ वर्मा याला तिसऱ्या गेममध्ये डोके वर काढण्याची संधी दिली नाही.उपांत्य लढतीत सध्याचा राष्ट्रीय सीनियर बॅडमिंटन विजेता मिथुन मंजुनाथ याला तीन गेममध्ये हरविलेल्या थरुण याने तिसऱ्या गेममध्ये सलग सहा गुण जिंकत सामना आणि सुवर्णपदक खिशात टाकले. तीस वर्षीय सौरभ वर्मा याने २०१५ साली केरळ मधील स्पर्धेत पुरुष एकेरीचे सुवर्णपदक जिंकले होते. आता पुनरागमन करताना पुन्हा एकदा विजेतेपदासाठी तो प्रयत्नशील होती, परंतु थरुण याच्या झुंजार खेळासमोर सौरभला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सौरभने २०११ साली राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सांघिक बॅडमिंटनमध्ये ब्राँझपदक जिंकले होते.

National Games 2023 : मिश्र दुहेरीत तेलंगणाच विजेता

मिश्र दुहेरीत तेलंगणाच्याच नवनीत बोक्का व के. मनीषा यांनी सुवर्णपदक जिंकले. त्यांनी आंध्र प्रदेशच्या गौस शेख व डी. पूजा जोडीवर २१-८, २१-१७ अशी मात केली.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news