IND vs PAK World Cup 2023 : भारत-पाकिस्तान महामुकाबला, जाणून घ्या कुणाची किती ताकद? | पुढारी

IND vs PAK World Cup 2023 : भारत-पाकिस्तान महामुकाबला, जाणून घ्या कुणाची किती ताकद?

पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषक २०२३ (ICC World Cup 2023) मध्ये आज (दि.१४) एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारताचा सामना दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे (IND vs PAK). विश्वचषक सुरू झाल्यापासून क्रिकेट चाहते या सामन्याची वाट पाहत आहेत. दोन्ही संघ वनडेमध्ये आतापर्यंत १३४ वेळा एकमेकांना भिडले आहेत. भारताने ५५ तर पाकिस्तानने ७३ वेळा मैदान मारले आहे. पण क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीम ७-० ने पुढे आहे. मागील आशिया कप (World Cup) मध्ये दोन वेळा भिडल्यानंतर आज भारत-पाकिस्तान टीम पुन्हा एकदा आज आमने-सामने येण्यासाठी सज्ज आहेत. तत्पूर्वी जाणून घेवूया दोन्ही संघाची ताकद आणि कमजोरी, एक्स-फॅक्टर आणि धोके…(IND vs PAK World Cup 2023)

संबंधित बातम्या : 

ताकद काय आहे? (IND vs PAK)

भारत – भारताची सर्वात मोठी ताकद फलंदाजी आहे. टॉप ऑर्डरपासून मधल्या फळीपर्यंत अनेक फलंदाज आहेत. विशेष म्हणजे जवळपास सर्वच फॉर्ममध्ये आहेत. यासोबतच कुलदीप यादवच्या नेतृत्वाखाली भारताची फिरकी गोलंदाजीही मजबूत आहे.

पाकिस्तान – वेगवान गोलंदाजी पाकिस्तानसाठी नेहमीच ताकद राहिली आहे. शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली हसन अली आणि हारिस रौफ कोणत्याही फलंदाजीच्या क्रमांकावर कहर करू शकतात. यासोबतच कर्णधार बाबर आझमही जगातील नंबर वन फलंदाज आहे.

दोन्ही संघांची कमजोरी

भारत – भारतीय संघात सातव्या क्रमांकानंतर असा एकही खेळाडू नाही ज्याच्या बॅटवर विश्वास ठेवता येईल.

पाकिस्तान – पाकिस्तानची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे त्यांची फिरकी गोलंदाजी. शादाब खानला वनडेमध्ये टी-२० ची जादू दाखवता आलेली नाही. नवाजची प्रकृतीही चांगली नाही.

भारत-पाकिस्तानचा (IND vs PAK) एक्स-फॅक्टर

भारत – कुलदीप यादव टीम इंडियासाठी एक्स फॅक्टर असणार आहे. आशिया कपमध्ये त्याने पाकिस्तानच्या फलंदाजांना सळो की पळो केलं होतं. कुलदीपची फिरकी अशीच सुरू राहिल्यास पाकिस्तानला डोकेदुखी होऊ शकते.

पाकिस्तान – यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान चांगला फॉर्मात आहे. श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावणाऱ्या रिझवानला कोणत्याही परिस्थितीत रोखायचे आहे.

धोका काय असेल?

भारत- भारतीय संघ तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून शार्दुल ठाकूरला संधी देत ​​आहे. मोहम्मद शमी बेंचवर बसला आहे. गेल्या सामन्यात सिराजला पराभूत केल्यानंतरही कर्णधार रोहितने डेथ ओव्हर्समध्ये शार्दुलला गोलंदाजी दिली नाही.

पाकिस्तान – विश्वचषकात पाकिस्तानला भारताविरुद्ध अद्याप विजय मिळवता आलेला नाही. मोठ्या सामन्यांमध्ये संघाच्या खेळाडूंची बॅट तळपत नाही. भारताला मुकाबला करायचा आहेच. शिवाय दबावातही चांगली खेळी करावी लागेल. (IND vs PAK World Cup 2023)

हेही वाचा : 

Back to top button